Related Posts

इंडिगोचा अजब कारभार, प्रवाशांना जायचं होतं पुण्याला पोहोचवलं हैदराबादला

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे&comma; पुण्याला जाण्यासाठी नागपुरातून प्रवासी विमानात बसले&comma; मात्र त्यानंतर ते थेट हैदराबादला पोहोचले आहेत&period; या प्रवाशांना इंडिगोच्या विमानानं पुण्याला जायचं होतं&comma; मात्र त्यांना हैदराबादला पोहोचवण्यात आलं&period; विशेष म्हणजे जेव्हा विमान हैदराबादला पोहोचलं&comma; तेव्हा तिथे देखील त्यांना तब्बल एक तास विमानाच्या बाहेर येऊच दिलं नाही&comma; झालेल्या घटनेमुळे या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला&comma; अखेर प्रवाशांचा संयम सुटला आणि त्यांनी विमानातच गोंधळ घालायला सुरुवात केली&period; प्रवाशांनी विमानात गोंधळ सुरू केल्यामुळे अखेर या प्रवाशांना विमानातून बाहेर सोडण्यात आलं&comma; नागपुरहून पुण्याला निघालेले अनेक प्रवासी अजूनही हैदरबाद विमानतळावरच अडकून पडले आहेत&period; सध्या या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>समोर आलेल्या माहितीनुसार नागपूरातील प्रवाशांना इंडिगोच्या विमानाने पुण्याला जायचे होते&period; मात्र इंडिगोने गुरुवारी प्रवाशांना मध्यरात्री नागपुरातून घेऊन पुण्याऐवजी हैदराबादला सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे&period; काल रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी नागपूर – पुणे अशी इंडिगोची फ्लाईट नियोजित होती&period; मात्र ती फ्लाईट एक वाजेपर्यंत नागपुरातून उडालीच नाही&comma; त्यानंतर रात्री एक वाजता फ्लाईटने उड्डाण घेतले&period; मात्र अर्ध्या तासाच्या उड्डाणानंतर आपल्या विमानाला पुण्यात लँड होण्याची परवानगी मिळत नाही&comma; त्या ठिकाणी लँड होण्यासाठी जागा नाही&comma; असं कारण सांगून इंडिगोच्या पायलटने आणि व्यवस्थापनाने फ्लाईट पुण्या ऐवजी हैदराबादला लँड केली&period;<&sol;p>&NewLine;<p>हे विमान हैदराबादला लँड झाल्यानंतरही प्रवाशांना सुमारे एक तास विमानाच्या बाहेर येऊ दिले नाही&period; अखेरीस काही प्रवाशांनी विमानाच्या आत गोंधळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना हैदराबाद टर्मिनल्सवर विमानातून बाहेर सोडण्यात आले&period; अजूनही नागपूरचे अनेक प्रवासी जे पुण्याला जायला निघाले होते&comma; ते हैदराबादमध्येच अडकून पडले आहेत&period; नागपूरातील प्रवाशांनी दिलेल्या माहितीप्रमाणे वाराणसीवरून पुण्याला जाण्यासाठी निघालेले देखील अनेक प्रवासी सध्या हैदराबादमध्ये अडकून पडले आहेत&period; हैदराबाद विमानतळावर प्रचंड हाल होत असल्याची तक्रार या प्रवाशांनी केली आहे&period;<&sol;p>&NewLine;