Related Posts

रशियाचं भारताला सर्वात मोठं गिफ्ट, पुतिन यांनी केली थेट घोषणा, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का

<p><strong>नवी दिल्ली &colon;-<&sol;strong> रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत&period; गुरुवारी त्यांचं भारतामध्ये आगमन झालं&period; दरम्यान त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्यामध्ये जवळपास दीड तास अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली&comma; या बैठकीमध्ये रशिया आणि भारतादरम्यान अनेक करार झाले आहेत&period; या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली&period; या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की भारत आणि रशियाच्या 23 व्या शिखर परिषदेमध्ये पुतिन यांचं स्वागत करताना मला आनंद होत आहे&period; भारत आणि रशियाची मैत्री अनेक ऐतिहासिक माईलस्टोनचा टप्पा पार करत असताना पुतिन यांचा हा भारत दौरा होत आहे&period; पुतिन यांच्या या भारत भेटीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे&period; विशेष&colon; अमेरिकेचं सर्वात जास्त लक्ष पुतिन यांच्या या दौऱ्याकडे आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे&comma; भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी करू नये अशी त्यांची भूमिका आहे&period; मात्र भारताची रशियाकडून तेलाची खरेदी सुरू आहे&period; त्यानंतर आता रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी या पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा केली आहे&period; रशियाकडून भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यात येत आहे&period; भविष्यात कितीही अडचणी आल्या तरी तेल पुरवठा कायम सुरूळीत सुरू राहिलं असं त्यांनी म्हटलं आहे&period; दरम्यान आता हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे&period; कारण भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये&comma; म्हणून अमेरिकेकडून दबाव निर्माण केला जात आहे&comma; मात्र आता पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>भारतानं रशियाकडून तेल खरेदी करू नये&comma; अशी अमेरिकेची भूमिका आहे&comma; मात्र भारतानं रशियाकडून तेलाची खरेदी सुरूच ठेवली आहे&comma; दुसरीकडे रशियानं देखील भारताला कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये प्रति बॅरलवर मोठी सूट देण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता&comma; त्यानंतर आता पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा करण्यात आली आहे&comma; हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे&period;<&sol;p>&NewLine;