Related Posts

कारधा–भंडारा वैनगंगा पुलावरील बंद पथदिवे तातडीने सुरू करा; ‘एन.ए.पी.एफ.’चा जनआंदोलनाचा इशारा

<p><strong>हंसराज&comma;भंडारा &colon;- <&sol;strong> कारधा–भंडारा येथील वैनगंगा नदीवरील पुलावर अनेक दिवसांपासून बंद असलेले पथदिवे à¤¤à¥à¤µà¤°à¤¿à¤¤ सुरू करावेत आणि महामार्गावरील धोकादायक खड्डे बुजवावेत&comma; या प्रमुख मागण्यांसाठी &&num;8216&semi;नॅशनल अट्रोसिटी प्रिव्हेन्शन फोर्स&&num;8217&semi;च्या &lpar;NAPF&rpar; वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रशासनाला निवेदन देण्यात आले&period; या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>हा पूल जिल्ह्याच्या दळणवळणाचा मुख्य दुवा असून दररोज हजारो वाहनांची येथून ये-जा सुरू असते&period; मात्र&comma; पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधार पसरून अपघातांचा धोका प्रचंड वाढला आहे&period; एका बाजूला सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात तत्पर असणारे प्रशासन&comma; नागरिकांच्या सुरक्षेसाठी पथदिवे सुरू करण्यास इतका विलंब का लावत आहे&quest; असा थेट सवाल संघटनेने उपस्थित केला&period; नेत्यांच्या स्वागताच्या बॅनरबाजीपेक्षा जनतेला सुरक्षित आणि खड्डेमुक्त रस्ते हवे आहेत&comma; अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हाधिकारी&comma; &&num;8216&semi;एनएचएआय&&num;8217&semi; &lpar;NHAI&rpar; व वाहतूक विभागाने संयुक्त पाहणी करून दुरुस्तीची कालमर्यादा निश्चित करावी&comma; अशी मागणी करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>या जनहितार्थ लढ्यात मुकुल सूर्यवंशी&comma; अभय डी&period; रंगारी&comma; सुभाष भिवगडे&comma; मोहित वैद्य&comma; कपिल रंगारी&comma; अरविंद लोखंडे यांच्यासह बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते&period;<&sol;p>&NewLine;