Related Posts

महिला व बाल सुधारगृह आणि महिला वसतिगृहातून पलायनाचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> महिला व बाल सुधारगृहातून मुली&comma; महिला पळून जाऊ नयेत यासाठी शासन संवेदनशीलपणे काम करत आहे&period; यासाठी आवश्यक उपाय योजना करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे&period; याचबरोबर महिला व बाल सुधारगृहातून पळून जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधान परिषदेत दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>सदस्य चित्रा वाघ यांनी राज्यातील महिला व बाल सुधारगृहाच्या सुरक्षा व व्यवस्थापनातील त्रुटींमुळे मुलींनी पलायन केल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता&period;<&sol;p>&NewLine;<p>मंत्री तटकरे यांनी सांगितले&comma; महिला व बाल सुधारगृहात तसेच महिला वसतिगृहात असणाऱ्या महिला व बालकांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले आहे&period; सध्या बाल सुधारगृहातून मुलांचे पलायनाचे प्रमाण ०&period;२९ टक्के तर महिलांचे तीन टक्के इतके आहे&period; बाल सुधारगृहातून पलायनाचे प्रमाण शून्य टक्के पर्यंत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत&period; यासाठी बाह्ययंत्रणेद्वारे भरलेल्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले आहे&period; जी पदे भरण्याची प्रक्रिया प्रलंबित आहेत त्यांची भरती एक महिन्यात करण्याबाबत कार्यवाही केली जाईल&period;<&sol;p>&NewLine;<p>उल्हासनगर येथील शांती सदन वसतिगृहातील घटनेसंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले&comma; उल्हासनगर येथील शांती सदन वसतिगृहात घटना घडली त्या दिवशी एकूण १२ महिला प्रवेशित होत्या&period; त्यापैकी तीन बांगला देशातील&comma; एक बिहार&comma; एक गुजरात&comma; एक पश्चिम बंगाल तसेच सहा महिला महाराष्ट्रातील होत्या&period; वसतिगृहाची क्षमता १०० असली तरी त्यावेळी केवळ २१ महिला तिथे राहत होत्या&period; सुरक्षा व्यवस्थेत एक सुरक्षा रक्षक आणि एक महिला पोलीस कर्मचारी तैनात होते&period; एफआयआरनुसार प्रवेशित महिलांनी दोन्ही सुरक्षा कर्मचारी यांना मारहाण करून लॉक करून सहा फूट उंच भिंत ओलांडून पलायन केले&period; ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत दिसत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>पळून गेलेल्या १२ महिलांपैकी ११ महिला अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा &lpar;आयटीपीए&rpar; अंतर्गत कल्याण-डोंबिवली परिसरातील विविध ठिकाणांवरून सुटका करून संस्थेत दाखल करण्यात आल्या होत्या&period; एक महिला ठाणे परिसरातून दाखल करण्यात आली होती&period; सर्व महिला १९ ते ५० वयोगटातील होत्या&period;<&sol;p>&NewLine;<p>उल्हासनगर येथील वसतिगृहातील सुरक्षा वाढवण्यासाठी भिंतीची उंची वाढवण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आला आहे&period; वसतिगृहातील सुरक्षा&comma; सोयी सुविधा&comma; कर्मचारी भरती या संदर्भात सविस्तर बैठक घेण्यात येईल&period; तसेच अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील&period; वसतिगृहात १२ मंजूर पदे असून सात पदे भरलेली तर पाच पदे रिक्त आहेत&period; बाह्ययंत्रणेद्वारे नियुक्त केलेली चार पदे कार्यरत आहेत&period; सुरक्षा व्यवस्थेसाठी गृह विभागाकडे अधिक पोलीस बंदोबस्त मागितला असल्याचेही महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;