कोंढाळी :- दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीसांनी अवैधरित्या दारू बाळगुन विक्री करणाऱ्यांवर छापा टाकुन देशी दारू, मोहाफुल दारू असा एकुण ३१४०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस स्टेशन कोंढाळी येथे एकुण २ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन पारशिवनी येथे १ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन खापा येथे १ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन बुट्टीबोरी येथे १ गुन्हा नोंद आहे. महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अन्वये एकुण ०५ गुन्हे नोंद केले आहे.
सदर कारवाईत ५०४० मिली देशी दारु, ०९ लीटर मोहाफुल दारू असा एकुण ३१४०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशवंत मुद्देमाल पंचनामा कारवाई करून नष्ट करण्यात आला आहे.




