spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा नोंद आरोपी अटक, मौदा पोलीसांची कामगिरी

मौदा :- मौदा पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, अवैधरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतुक केली जात आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी मौजा माथनी टोल नाका येथे नाकाबंदी केली असता संशयीत वाहन ट्रक क्रमांक एम एच ४०सी एम ९५९९ मिळुन आला. वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळुन आली. वाहन चालकाला नाव पत्ता विचारला असता, मोहम्मद शाबीर वल्द मोहम्मद रफीक, वय ४० वर्ष, रा. डीएड कॉलेज जवळ अमरावती असे असुन सदर वाहन त्याचेच मालकीचे असल्याबाबत त्याने माहीती दिली. त्याला परवान्याबाबत विचारणा केली असता त्याने कोणताही परवाना नसल्याबाबत सांगितले. पोलीसांनी पंचासमक्ष १) ट्रक क्रमांक एम एच ४०सी एम ९५९९ आणि १० ब्रास रेती असा एकुण ३५,५०,०००/- रूपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.

सदर प्रकरणी वाहन आरोपीविरूध्द पोस्टे मौदा येथे कलम ३०३ (२) भा.न्या.सं, सहकलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमिन महसुल संहीता, कलम ४, १२ खाण खनिज अधिनियम, कलम ३ सा.सं.नु.प्र.अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Popular Articles