spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरित्या विनापरवाना दारू काढणारे, दारू बाळगुण विक्री करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध ०७ गुन्हे नोंद

नागपूर :- दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीसांनी अवैधरित्या दारू बाळगुन विक्री करणाऱ्यांवर छापा टाकुन देशी दारू, मोहाफुल दारू असा एकुण ४१.९०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये एकुण ०७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलीस स्टेशन भिवापूर येथे १ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन रामटेक येथे ०३ गुन्हे नोंद आहे. पोलीस स्टेशन खापा येथे १ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन बुट्टीबोरी येथे १ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन बेला येथे १ गुन्हा नोंद आहे. महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम अन्वये एकुण ०७ गुन्हे नोंद केले आहे. सदर कारवाईत ४५९० मिली देशी दारु, ३२ लीटर मोहाफुल दारू असा एकुण ४१९०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशवंत मुद्देमाल पंचनामा कारवाई करून नष्ट करण्यात आला आहे.

Popular Articles