spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वार्षिक महोत्सव हे विद्यार्थ्यांना सुप्त कला गुण प्रदर्शित करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ – डॉ राजाभाऊ उत्तरवार 

कामठी :- वार्षिक महोत्सव हे विद्यार्थ्यांना सुप्त कला गुण प्रदर्शित करण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ असून प्रत्येक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभागी होऊन आपले सुप्त कला गुण प्रदर्शित करून आपला व आपल्या शाळेचा नावलौकिक करण्याचे आव्हान संज्ञा संवर्धन संस्था नागपूरचे संचालक डॉ राजाभाऊ उत्तरवार यांनी कामठी येथील माँ शारदा ज्ञान मंदिर शाळेच्या वार्षिक महोत्सवाच्या उद्घाटना प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले वार्षिक महोत्सवाचे उद्घाटन संज्ञा संवर्धन संस्था नागपूरचे संचालक डॉ राजाभाऊ उत्तरवार यांचे हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी गौरी उत्तरवार, प्रेमप्रकाश गोयल ,सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुधाकर भोगाळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका चंदा भोंगाळे ,रामकृष्ण संस्कृती पिठाचे महासचिव प्रभू नवघरे , सुषमा राखडे ,आशा मिश्रा ,वनिता चौरसीया, विनोद जुमडे उपस्थित होते वार्षिक महोत्सव अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शनी, विविध कलाकृती प्रदर्शनी, गीत गायन ,एकल नृत्य, समूह नृत्य, राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले प्रमुख अतिथीं कार्यक्रमात मार्गदर्शन करताना म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पालकाचे फार मोलाचे योगदान असून प्रत्येक पालकांनी बालवयातच विद्यार्थ्याला सुसंस्कृत करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आव्हान केले ,सोबतच विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभागी होऊन आपला व आपल्या शाळेचा नाव लौकिक करण्याचे आव्हान केले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जय श्री बरबटे यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक उपस्थित होते.

Popular Articles