spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर ग्रामीण जिल्हयात अवैध जुगार चालवणाऱ्यावर ११ गुन्हे नोंद

नागपूर :- नागपुर ग्रामीण जिल्हयात महाराष्ट्र जुगार कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीसांनी अवैधरित्या स‌ट्टाप‌ट्टीचे आकडे लावुन हारजीतचा जुगार खेळणाऱ्या तसेच ५२ ताशपत्त्याचा जुगार खेळणाऱ्या आरोपीतांवर छापा टाकुन सटट्टापटदी साहित्य व ५२ ताशपत्ते, नगदी रोख असा एकुण ११,८२३/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस स्टेशन बेला येथे आरोपी नामे दिपक टीकाराम उके, वय ५२ वर्षे, रा. पिपरा, ता. उमरेड, जि. नागपुर याचेवर गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन बु‌ट्टीबोरी येथे आरोपी क्र. १) नामे लंकेश बन्सीरामजी उईके वय ३९ वर्ष रा वर्षा रोड वारंगा जि नागपुर आरोपी क्र. २) फिरोझ शट्टी झाकणेकर वय ४३ वर्ष रा बोरखेडी रेल्वे जि नागपुर यांचेवर प्रत्येकी ०१ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन नरखेड येथे आरोपी नामे- श्रावन पंजाबराव नेहारे, वय ५२ वर्षे, रा. मालापुर, ता. नरखेड यांचेवर गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन जलालखेडा येथे आरोपी क्र. १) नामे मयुर शेषराव पारधी, वय ३५ वर्ष, रा. थडीपवनी २) गजानन वासुदेव काटोलकर, वय ३४ वर्ष, रा. वार्ड ५ जलालखेडा, ता. नरखेड, जि. नागपुर यांचेवर प्रत्येकी १ गुन्हा नोंद आहे. पोलीस स्टेशन उमरेड येथे आरोपी नामे-शुध्दोधन मुरारी रंगारी, वय ३३ वर्ष, रा. उदासा वार्ड क. ०३, ता. उमरेड, जि. नागपुर यांचेवर गुन्हा नोंद आहे.

Popular Articles