spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान नगरपरिषद निवडणुकित नगराध्यक्ष म्हणुन भाजपचे राजेंद्र शेंदरे विजयी

– कन्हान मध्ये नगरसेवक भाजप १४, कॉग्रेस ०३, शिवलेना (शिंदे) ०३

कन्हान :- नगरपरिषद निवडणुक २०२५ मध्ये भाज पाने स्पष्ट बहुमत मिळवत नगरपरिषद ताब्यात घेतली असुन नगरसेवक एकुण २० जागांपैकी भाजपाने १४ जागांवर विजय मिळवुन काँग्रेस व शिवसेनेला प्रत्येकी ३ जागांवर रोखले. नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकी त भाजपचे राजेंद्र शेंदरे यांनी २,०८३ मतांच्या आघाडी ने विजय मिळवला.

कन्हान-पिपरी नगराध्यक्षपदा करिता झालेल्या निवडणुकीत एकुण २६,९७४ मतदारांपैकी १६,८२७ मतदारांनी मतदानाचा अधिकार बजाविल्याने मतदा नाची टक्केवारी ६२.३८ इतकी होती. यात १) करूणा आष्टणकर (अपक्ष)- ५४४, २) मधुकर नागपुरे (उबाठा ) – ४०४, ३) चंद्रशेखर पडोळे (काँग्रेस) – २७७७, ४) मनोहर पाठक (राष्ट्रवादी कॉ. अजित) – १७९२, ५) वर्धराज पिल्ले शिवसेना (शिंदे) – ३७५३, ७) सतिश बेलसरे कन्हान युथ फाऊंडेशन (अपक्ष) – ८८६ , ६) रूपेश मेश्राम (बसपा)- ६७७, ८) राजेंद्र शेंदरे (भाजपा ) – ५८३६ आणि ९) नोटा – १५८ असे मतदान झाले. यात सर्वाधिक भाजपचे राजेश शेंदरे यांनी ५८३६ मते घेतल्यानी त्यांना २०८३ मतानी विजयी घोषित कर ण्यात आले.

प्रभागनिहाय निकालात प्रभाग क्र. १ मध्ये भाजपचे योगीता भेलावे – ४७० व विनोद किरपान – ६५४ मतदान घेतले व प्रभाग क्र.२ मध्ये प्रशांत पाटील – ४४६ व सुषमा चोपकर- ४८९, प्रभाग क्र. ४ मध्ये केतन भिवगडे – ५२१ व पुनम राठी ५१६, प्रभाग क्र. ५ मध्ये सुचित्रा माटे – ५२८ व चिंटु (शिवशंकर) वाकुडकर – ५५२ व प्रभाग क्र. ६ मध्ये रिंकेश चवरे – ७२३ व प्रियंका हटवार ६४६, प्रभाग क्र. ७ मध्ये आशा माहातो – ७९६, व मनोज कुरडकर – ७९० तर प्रभाग क्र. १० मध्ये मोनिका पौनिकर ६५३ व शक्ती पात्रे – ४३८ असे १४ नगरसेवक भाजप चे विजयी झाले. काँग्रेस चे प्रभाग क्र. ३ मध्ये शमशेर पुरवले – ७१२ व निती तेलोते – ६६५, प्रभाग क्र ९ मध्ये कॉग्रेस च्या एक रेखा टोहणे १०१९ असे ०३ नगरसेवक विज यी झाले. आणि शिवसेना (शिंदे) चे प्रभाग क्र. ८ मध्ये लता लुंढेरे – ४०६ व हरिश तिडके – ४४६ आणि प्रभाग क्र. ९ मध्ये एक जुबेर सोनु खान – ६११ शिवसेना (शिंदे) असे ०३ नगरसेवक विजयी झाले. विशेष म्हणजे प्रभाग क्र. ९ मधुन कॉग्रेस च्या माजी नगरसेविका रेखा टोहणे यांनी सर्वाधिक १०१९ मते घेऊन विजयी झाल्या.

निवडणुक मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मुख्य निवडणुक अधिकारी प्रियदर्शनी बोरकर, सहाय्य क निवडणुक अधिकारी दीपक घोडके, नायब तहसिल दार रमेश पागोटे, प्रसन्न भुजाडे आदींच्या मार्गदर्शनात मतदान व मतमोजणी पार पडली. पोलीस प्रशासनाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड व पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या नेतृत्वात पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाजप च्या विजया नंतर शहरात जल्लोष साजरा करण्यात येत आहे.

Popular Articles