रामटेक :- रामटेक पोलीस पेट्रोलींग करीत असता मौजा मनिबुवा मठाजवळ, शनिवारी वार्ड, रामटेक येथे दोन संशयित इसम दिसुन आले. संशयित इसम पोलीस वाहनास पाहुन पळु लागले. त्यामुळे सदर इसम नक्कीच काहीतरी संशयास्पद असल्याचे पोलीसांना संशय आल्याने सदर इसमांचा पाठलाग करुन सदर इसमांना ताब्यात घेवुन नाव व पत्ता विचारले असता १) राम खुशाल गराडे, वय ३८ वर्षे, रा. शनिवारी वार्ड, रामटेक २) सलिम शेख, रा. कामठी, जि. नागपूर असे सांगितले. पोलीसांनी दोन्ही आरोपीची झाडती घेतली असता नमुद झडतीमध्ये दोन्ही आरोपीतांचे जवळ १) हिरवट काळसर रंगाचा ओलसर गुंगीकारक वनस्पती गांजा वजन १७२ ग्रॅम किंमती ४,०००/- रू. २) एक पिवळया रंगाची प्लास्टिक पिशवी ३) एक जुनी वापरती काळसर रंगाची ज्यावर लाल रंगाचे पत्याची डिझाईन असलेली कापडी पिशवी किं. ००/रू. ४) एक आकाशी रंगाचा सॅमसंग गॅलेक्सी ए. १५ मोबाईल किंमती १५,०००/- रू. असा एकूण १९,०००/-रूपयाचा मुद्देमाल आरोपीतांकडुन जप्त करण्यात आला आहे.
नमुद प्रकरणी आरोपीतांविरूध्द पोलीस स्टेशन रामटेक येथे एन. डी. पी. एस. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.








