spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बुटीबोरी पोलीस स्टेशन बेपत्ता व्यक्ती खुन प्रकरणात अजुन ३ आरोपी निष्पन्न

बुटीबोरी :- फिर्यादी नामे अभिजित वसंता नेवारे, वय २२ वर्ष, रा. निखाडे ले आऊट, सातगाव, ता. हिंगणा, जि. नागपूर यांनी बोरी पोलीस स्टेशनला माहीती दिली की, दिनांक ०९/०१/२०२६ रोजी फिर्यादीचे वडील वसंता रामाजी नेवारे, वय ४८ वर्ष हे नेहमीप्रमाणे रात्री ०९/३० वा. पर्यंत त्यांच्या मोटारसायकल ने कामावर गेले व दुस-या दिवशी दिनांक १०/०१/२०२६ रोजी सकाळी १०/०० वा. पर्यंत नेहमीप्रमाणे कामावरून घरी न आल्याने फिर्यादीने नातेवाईक व ओळखीचे लोकांकडे तसेच परिसरात त्यांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही. त्यांची मो.सा. सातगाव येथील एका दारूचे दुकानाजवळ सापडली त्यामुळे फिर्यादीने पोलीस स्टेशन बुटीबोरी येथे त्यांचे वडील बेपत्ता असल्याबाबत मिसींग तक्रार दाखल केली. दिनांक १५/०१/२०२५ रोजी नमुद बेपत्ता व्यक्तीचा खुन झाल्याचे उघड झाल्याने नमुद प्रकरणी कलम १०३(१), ३(५) भा.न्या.स. २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फिर्यादी नामे अभिजित वसंता नेवारे, वय २२ वर्ष, रा. निखाडे हर्ष ए. पोहार पोलीस अधीक्षक नागपुर ग्रामीण जिल्हा आणि अनिल म्हस्के, अपर पोलीस अधिक्षक, नागपुर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक १५/०१/२०२६ रोजी बुटीबोरी पोलीसांनी गुप्त बातमीदार आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपी लोकेश उर्फ लंक्या हिरालाल ढाबरे, २८ वर्षे रा. सातगाव, रिषोय याला ताब्यात घेवुन त्याला अटक करून त्याचे कडे कौशल्यपुर्ण विचारपुस केली असता फिर्यादीचे वडील मृतक नामे वसंता रामाजी नेवारे, वय ४८ वर्ष, यांना आरोपी लोकेश धाबोर्डे आणि त्याच्या साथीदारांनी वडगाव गुजर ता.जि नागपुर येथे नेवुन दारू पिण्याचे वादातुन खुन केल्याची माहीती प्राप्त झाली. नमुद प्रकरणी बुटबोरी पोलीसांनी आरोपी कं २ ब्रिजेश भैय्यालालकुमार, वय २५ वर्षे, रा. शिवप्रसाद नगर, सुरजपुर, राज्य छत्तीसगढ, ह.मु सातगाव याला सातगाव येथुन ताब्यात घेवुन दिनांक १७/०१/२०२६ रोजी अटक केली गुन्हा केल्यानंतर इतर साथीदार हे मिळुन येत नव्हते. त्यांचा कसून शोध घेत गुन्हयात साखळी पुरावे जोडत बुटीबोरी पोलीसांचे एक पथक आरोपीचे इतर साथीदारांच्या शोध कामी राज्य छत्तीसगढ येथे स्वाना झाले. पोलीस पथकाने दिनांक १८/०१/२०२६ रोजी देवनगर, जि. सुरजपुर, राज्य छत्तीसगढ येथून २ आरोर्पीना ताब्यात घेतले आहे.

Popular Articles