spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरित्या दारू विकी करणाऱ्या गुन्हेगारास नागपुर जिल्हयातुन केले हद्दपार

अरोली :- हदद्दीतील अवैध दारू काढणाऱ्या, विकी करणाऱ्या तसेच अवैध दारू व्यवसायात सकिय आरोपी नामे रामेश्वर माधोराव उके, वय ४५ वर्ष, रा. धर्मापुरी ता. मौदा जि. नागपूर यास महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (ब) अन्वये उपविभागिय दंडाधिकारी, मौदा यांनी हद्दपार केले.

सराईत गुन्हेगार नामे रामेश्वर माधोराव उके, वय ४५ वर्ष, रा. धर्मापुरी ता. मौदा जि. नागपूर याचेवर अवैध रित्या मोहाफुल व गावठी दारू काढणे, विक्री करणे असे अनेक गुन्हे नोंद आहे. नमुद आरोपीचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरीता वेळोवेळी पोलीसांनी त्यांचेवर प्रतिबंधक कार्यवाही सुध्दा केली आहे. परंतु आरोपी याने आपली गुन्हेगारी गतिविधी निरंतर सुरूच ठेवली. आरोपीतांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परीसारातील अनेकांना दारूचे व्यसन जडले आहे. तसेच त्यांच्या कृत्यामुळे शांततेचा भंग होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यामुळे गुन्हेगार रामेश्वर माधोराव उके याचा महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (ब) अन्वये हद्दपार करण्याचा प्रस्ताव अरोली पोलीसांनी उपविभागिय पोलीस अधिकारी, रामटेक यांच्या मार्फतीने उपविभागिय दंडाधिकारी, मौदा यांचे कडे पाठविला असता त्यांनी प्रस्ताव मंजुर करून वर नमुद आरोपी यांना ३ महीन्यांकरीता नागपुर ग्रामीण व जिल्हयातुन हद्दपार केले आहे.

नागपुर ग्रामीण जिल्हा पोलीसांतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नमुद आरोपी हा नागपुर ग्रामीण व नागपुर जिल्हा हद्दीत दिसुन आल्यास नजिकच्या पोलीस स्टेशनला तात्काळ माहीती द्यावी.

Popular Articles