नागपूर :- आपल्या दाइत्वाचे स्वतःला झोकून देऊन निर्वाहन करणाऱ्या गौरी कर्तुत्ववान कार्यकर्ता, आदर्श गृहिणी, आदर्श सासू, आणि संपूर्ण समर्पित कार्यकर्त्या होत्या. अशा शब्दात केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी गौरीताईंना श्रद्धांजली अर्पण केली. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या स्व. गौरी चान्द्रायण यांची शोकसभा अखिल भारतीय ग्राहक पंचायत नागपूर जिल्हा आणि महानगर यांच्या वतीने रविवारी 25 जानेवारीला संपन्न झाली. दक्षिण अंबाझरी मार्गावरील धरमपेठ पब्लिक स्कूलच्या स्व. रावसाहेब रांगोळे सभागृहात झालेल्या या शोकसभेला व्यासपीठावर केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, न्यायमूर्ती विकास शिरपूरकर, भारतीय मजदूर संघाचे जेष्ठ नेते वसंतराव पिंपळापुरे राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सह बौध्दिक प्रमुख डॉ. लीना गहाणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंपर्कप्रमुख अरविंद कुकडे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अशोक दिलीप चान्द्रायण, त्रिवेदी उपस्थित होते तर कार्यक्रमाला चान्द्रायण परिवारातील डॉ. कपिल आणि आणखी पारिवारिक जन उपस्थित होते. विद्यार्थी परिषदे पासूनच मी नितीन गडकरी आपल्या भावपूर्ण भाषणात पुढे म्हणाले त्यांना ओळखत होतो, त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध होते, मांनलेल्या भगिनी होत्या अभ्यासू वृत्ती, कार्य करण्याची प्रवृत्ती, संघटन कार्यात जबरदस्त हातोटी. आणि लाघवी वक्तृत्व त्यामुळे त्या चटकन समोरच्या सभेचे लक्ष वेधून घे आणि आपले अभ्यासपूर्ण मुद्दे श्रोत्यांना भारवून टाकीत. ग्राहकांचे त्यांना समजणाऱ्या भाषेत बोलून त्यांच्या समस्यांचे समाधान करीत, त्यामुळे त्यांचा संपर्कही उत्तम होता, त्यांच्या जाण्याने ग्राहक पंचायतीला निश्चितच त्यांची अनुपस्थिती जाणवेल. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. न्यायमूर्ती विकास शिरपूरकर, गौरी चान्द्रायण यांना मी 2004 पासून ओळखतो, काही कायदेशीर समस्या घेऊन त्या माझ्याकडे आल्या होत्या.त्यांचे निवेदन ऐकून मी प्रभावीत झालो, अतिशय प्रामाणिक, समंजस आणि परिश्रमी अशा त्या होत्या. त्यांना प्रश्नांची जाण होती समोर असणाऱ्या कायदेशीर समस्यांबाबत त्या जाणून घेत त्याबाबतचे प्रश्न उपस्थित करीत आणि त्यानंतर निर्णयापर्यंत जाण्याचा त्यांचा स्वभाव माझ्या लक्षात आला. त्याबाबत त्या अतिशय प्रामाणिक होत्या. सदैव हसतमुख आणि आवर्जून त्या आमच्याकडे येत, त्यांना चिकू फार आवडत असे, मला पुढल्या वेळी आले ज्या झाडाचे चिकू द्यावे असे हक्काने सांगत एकदाचे घाई गर्दीने माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या नितीन गडकरी तुमच्याकडे येणार आहेत. त्यांना तुम्हाला भेटावयाचे आहे. आहे, अशा सूचना देत. गौरी सोबत अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहता आले परंतु आज या त्यांच्या या अशा कार्यक्रमात मला उपस्थित रहावे लागले ? याची मला दुःख होते. भारतीय मजदूर संघाचे वरिष्ठ नेते वसंतराव पिंपळापुरे यांनी आपल्या भाषणात गौरीताई च्या संघटनात्मक गुणाचे कौतुक केले आणि त्यांच्या वक्तृत्व कलेतील नैपुण्याची माहिती दिली. ते म्हणाले गौरी आंदोलनातील नेता होती तिचे सासरे सासू आणि पती देखील सामाजिक दायित्व मानणायांपैकी आणि त्यासाठी सक्रिय राहणाऱ्या घरातील आहेत. त्यामुळे गौरीच्या सामाजिक कार्याला बळ मिळत गेले. सर्व गृहकर्तव्य आटपून कुटुंब बांधून ठेवणे हेही तिला साधले होते. सामाजिक कार्याला वेळ देणे, त्यासाठी प्रवास करणे, दुर्दम्य आशावाद, आत्मविश्वास हे तिचे बळ होते अशा शब्दात वसंत रावांनी गौरीचान्द्रायण यांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रीय सेविका समितीच्या अ.भा.सह बौद्धिक प्रमुख, डॉ. लीना गहाने, म्हणाल्या सतत हसतमुख आणि प्रसन्न असणाऱ्या गौरीला दवाखान्यात बघताना, प्रश्न पडला इतकी स्वस्थ कशी बसू शकते, सतत प्रोत्साहन देणारी आणि चरैवतीचा मंत्र देणारी, नही रुक ना, नही थकना यही तो मंत्र है अपना.. म्हणणाऱ्या गौरी अंथरुणावर पडल्या असल्या तरी त्यांच्या नजरेत अस्वस्थपणाची जाणीव होत होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंपर्कप्रमुख अरविंद कुकडे यांनी गौरीताई यांच्या जीवनाचा आलेखच, समोर ठेवला, प्रतुकूलतेला झुगारून ग्राहक संघटना अधिक मजबूत करण्याचे त्यांचे प्रयत्न आणि धडपड मी अनुभवले आहे. वक्तृत्वाचे वरदान त्यांना मुळातच प्राप्त होते, लहानपणी अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्या अग्रेसर असत, संघटनेच्या बांधणी त्यांच्या वक्तृत्व गुणांचाही मोठा वाटा आहे, त्यांचे जाणे संघटनेसह सर्वांनाच अस्वस्थ करणारे आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अशोक त्रिवेदी यांनी नागपूर ग्राहक पंचायतीतील महिलांचा सहभाग तसा सहज आणि व्यापक करण्याचे काम गौरीच्या यांनी केले हा विषय मांडला आणि गौरीताईंसारख्या नेतृत्वाची अखिल भारतीय ग्राहक पंचायतीला नेहमीच कमी जाणवेल अशी परिस्थिती त्यांनी करून ठेवली आहे. असे ते म्हणाले, कार्यकर्त्यांना जोडणे सहज सुलभ आणि समजणाऱ्या पद्धतीने समस्यांचे निराकरण करणे हा त्यांचा गुण होता ग्राहक पंचायतीच्या प्रतिनिधी म्हणून ज्या ज्या पदावर त्यांनी कार्य केले तेथे पण त्यांनी गाजविले आणि ग्राहकांच्या प्रश्नांची इती पूर्ती केली. शोकसभेचे भावूक संचालन माजी नगरसेविका श्रद्धा पाठक शोकसभेला स्वदेशी जागरण मंचाचे शिरीष तारे, रा.स्व.संघाचे महानगर कार्यवाह रवींद्र बोकारे, मोहन अग्निहोत्री, डॉक्टर दिलीप गुप्ता, क्रेडाइचे चावला, वीज महावितरणाचे काही अधिकारी, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य गजानन पांडे, हायकोर्ट बार असोसिएशनच्या एडवोकेट स्मिता देशपांडे, सुधांशु दाणी, प्रमोद भागडे, नगरसेविका शिवानी दाणी-वखरे, अ.भा.ग्राहक पंचायत नागपूर जिल्हा आणि महानगर कार्याध्यक्ष संजय धर्माधिकारी, नागपूर जिल्हा अध्यक्ष गणेश शिरोळे, जिल्हा सचिव प्रकाश भुजाडे, महानगर सचिव राजीव पुसदेकर, अँड. वृषाली प्रधान, महिला प्रमुख सौ तृप्ती आकांत, श्रीपाद हरदास, उदय दिवे, अरविंद हाडे, जिवन झाडे, महेंद्र आकांत, अँड. सुफला ताटके, राजेश दिवाण, मौदा येथील जिल्हा उपाध्यक्ष विजय पांडे, गजेंद्र नासरे, दिलीप सांगडेकर, विलास पाथेर व राजू सेलोकर, अविनाश प्रभुणे, अँड.विलास भोसकर, तसेच इतर संघटनांचे पदाधिकारी व गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होते.
स्वीकारलेल्या जबाबदारीस मनःपूर्वक झोकून देऊन कार्य करणे हे गौरी ताईंचे वैशिष्ट्य – केंद्रीयमंत्री गडकरी









