हंसराज, प्रतिनिधी भंडारा अड्याळ :- जनता शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील गुप्ता प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दिनांक २९ जानेवारी ते शुक्रवार, ३० जानेवारी २०२६ या दोन दिवसीय कालावधीत हे स्नेहसंमेलन पार पडणार असून, यादरम्यान विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी विद्यार्थ्यांना व पालकांना मिळणार आहे.
स्नेहसंमेलनाचा औपचारिक उद्घाटन सोहळा गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजता संपन्न होईल. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून पंचायत समिती पवनीचे गट शिक्षणाधिकारी एस. बी. वासनिक उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हरिहर कुर्झेकर असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि. प. सदस्य डॉ. उल्हास हरडे, उपसरपंच शंकर मानापुरे यांची उपस्थिती लाभणार आहे.
याप्रसंगी पवनी पं. स. सदस्य सीमा गिरी, संस्था सचिव विपिन कुर्झेकर, कोषाध्यक्ष शुभम कुर्झेकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील पोटवार, माजी मुख्याध्यापक अनिल हरडे, माजी सहा. शिक्षिका मीनाकुमारी मेश्राम, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अरुण देशमुख, उपाध्यक्ष ममता खंडाईत, शिक्षणतज्ज्ञ पुरुषोत्तम घारगडे यांची विशेष उपस्थिती असेल. तसेच ग्रामपंचायत सदस्य विपिन टेंभुर्णे, पंकज वानखेडे, अनिल शेंडे, खुशाल गभने, रुची लारोकर, सपना काटेखाये, रजनी बोरकुटे, कविता देशमुख व ज्येष्ठ नागरिक शरद शिवरकर देखील उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनपर कार्यक्रमानंतर सकाळी ११ वाजता प्रेक्षणीय कार्यक्रम आणि दुपारी २ वाजता विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील.
शुक्रवार, ३० जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजता बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र हजारे, संस्था कोषाध्यक्ष शुभम कुर्झेकर, केंद्रप्रमुख संतोष मडावी, ग्रा. सदस्य मनोरमा मडावी यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित राहतील. वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करून कार्यक्रमाचा समारोप होईल.
या स्नेहसंमेलनाला विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याध्यापिका उषा ढेंगे, सहाय्यक शिक्षक नितीन वाणी, जयश्री हटवार, स्वाती भोवते, विद्यार्थी प्रतिनिधी महीम बेलखोडे, विद्यार्थिनी प्रतिनिधी अक्षरा पंकज वानखेडे तसेच शालेय कर्मचारी व्यंकट वंजारी आणि सुरेखा ढवळे यांनी केले आहे.








