खापा :- महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय, सिरोंजी (ता.सावनेर) येथे मंगळवार (दि.२७) रोजी बक्षिस वितरण व स्नेहभोजन समारंभ आयोजित करून वार्षिक महोत्सव २०२५-२६ ची सांगता करण्यात आली.
शैक्षणिक सत्राच्या प्रारंभापासून आजवर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या राखी मेकिंग, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, प्रश्नमंजुषा, दीपोत्सव, वंदे मातरम् वर्धापनदिन, संविधान जनजागृती पंधरवडा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, गायन व नृत्य स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनी,वर्ग सजावट, आनंद मेळावा, शालेय सांघिक व वैयक्तिक क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कला महोत्सव इत्यादी शालेय व सहशालेय उपक्रम आणि स्पर्धांमध्ये नेत्रदीपक यश प्राप्त विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते ढाल, पदक, प्रमाणपत्रे व शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या सादरीकरणाने विद्यार्थ्यांनी पालक वर्ग व उपस्थित गावकरी प्रेक्षकांच्या कौतुकाची व बक्षिसांची लयलूट केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हरिदास बाजनघाटे, प्रमुख पाहुणे माजी सैनिक राजेंद्र आत्राम, विठोबा साहारे, नागलवाडी सरपंच दिपाली ठाकरे, सिरोंजी सरपंच पुनम भिमटे, प्राचार्य संदीप भोंडे, कोषाध्यक्ष माजी विद्यार्थी संघ अतुल तिबोले, शाळा समिती सदस्य बाबाराव बुऱ्हाण, ओमेश भिमटे, रामराव उईके, रामभाऊ भोयर, सुरज निकोसे, मयूर साहारे, संजय गिरमेकर, किशोर बोरीवार, खलनसिंग खंडाते, किशोर बोभाटे, जितेंद्र बागडे, विकास बगमार, निलेश बोबडे, रविंद्र क्षीरसागर, राजेश गजभिये, रविंद्र उके, रविंद्र आहाके, दिनेश उईके, भगवान सिंग, रूपेश बोभाटे, शाळा समिती, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती पदाधिकारी व सदस्य तसेच पालक व नागरिक उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. ज्ञानेश दळवी, प्रास्ताविक प्राचार्य संदीप भोंडे तर आभार प्रदर्शन शिक्षक दीपक नारे यांनी केले. स्नेह भोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.








