spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जि.प.शाळा तोंडलीला जिल्हास्तरीय विनोबा पुरस्कार प्राप्त 

किशोर साहू:मौदा,ता.२९ :- विविध उपक्रम राबवत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासात पुढाकार घेणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडलीतील उपक्रमशील शिक्षिका व मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे यांचे विविध उपक्रम ,शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकरिता सुरू आहेत. महा वाचन चळवळ, कब बुलबुल उपक्रम,इंग्लिश स्पोकन सिरीज,स्पेल्लिंग बी,परसबाग, कार्यशिक्षणावरील उपक्रम असे विविध अभ्यासक्रम समायोजित पद्धतीने सर्वांगीण विकासासाठी कसे वापरता येतील याचे उत्तम उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडली. या सर्वांची दखल घेत मुख्याध्यापिका अनुराधा धुर्डे यांना जिल्हास्तरीय विनोबा पुरस्कार माननीय प्रवीण कांबळे माध्यमिक शिक्षणाधिकारी नागपूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी उपशिक्षणाधिकारी माध्यमिक तसेच निलेश नागपुरे, प्रणय देशभतर विनोबा टीम उपस्थित होते.

Popular Articles