spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रामटेक शहरातून जाणारी जड वाहतुक वळविल्याबाबत

रामटेक :- नागपुर ग्रामीण जिल्हयाअंतर्गत रामटेक येथे अयोध्या राममंदिर स्थापनेच्या संदर्भात महामहोत्सव अनुषंगाने नेहरू ग्राउंड, रामटेक येथे दि. ३१/०१/२०२६ ते दि. ०२/०२/२०२६ पर्यंत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमामध्ये रामटेक येथील स्थानिक नागरीक तसेच आजु बाजुच्या गावातील बहुसंख्य भावीक भक्त उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नेहरू ग्राउंड, रामटेक हे स्थळ हायवे लगत असल्याने वाहतुक अडथळा निर्माण होण्याची तसेच एखादा गंभीर अपघात होवून कायदा व सुव्यवस्था निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा व वाहतुक सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोणातून तसेच अपघाताची शक्यता टाळण्याच्या अनुषंगाने वाहतुकीचे नियमन व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, तसेच रोडवर गंभीर व प्राणांकित अपघात होवू नयेत याकरीता मा. श्री हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या आदेशान्वये दि. ३१/०१/२०२६ ते दि. ०२/०२/२०२६ चे १५.०० वा. पासुन ते २४.०० वा. पर्यंत जड वाहतुक खालील प्रमाणे वळविण्यात आली आहे.

तुमसर कडुन येणारी जड वाहतूक ही घोटीटोक येथुन अरोली मार्गे-निमखेडा फाटा-तुमान-निमखेडा-तारसा कन्हान-नागपूरकडे जातील

तुमसर कडुन येणारी जड वाहतूक ही घोटीटोक पंचाळा मांद्री मुसेवाडी – नायबी – महाराजपुर-मुखनापूर- चोरबावली मार्गे नागपूर ते जबलपूर हायवेकडे जाईल.

नागपूरकडून तुमसरकडे जाणारे जड वाहतूक ही फाटा-हमलापुरी-काचुरवाही मसला-घोटीटोक मौदा टी पॉईंट मार्गे हमलापुरी तुमसरकडे जाईल.

सदर आदेश दि. ३१/०१/२०२६ ते दि. ०२/०२/२०२६ पर्यंत दरारोज १५.०० वा. पासुन ते २४.०० वा. पर्यंत अंमलात राहणार आहे.

Popular Articles