spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपात दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना दिली आदरांजली

नागपूर :- देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करीत दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हुतात्मा दिनानिमित्त हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

मनपा मुख्यालयात सकाळी ११ वाजता आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून मौन श्रद्धांजली अर्पण केली. त्याचप्रमाणे यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तैलचित्राला आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी पुष्पहार अर्पण केला व इतर अधिकाऱ्यांनी पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी, उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, उपायुक्त मंगेश खवले, नगररचना विभागाचे उपसंचालक गिरीश गोडबोले, सहायक आयुक्त श्याम कापसे, कार्यकारी अभियंता रविंद्र बुंधाडे, कार्यकारी अभियंता अनिल गेडाम, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक ऋतुराज जाधव, सहायक विधी अधिकारी सुरज परोचे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, प्रमोद हिवसे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांनी देखील आदरांजली वाहिली. याशिवाय दहाही मनपा झोन कार्यालयासह व्हेरायटी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला तसेच गांधीसागर चाचा नेहरू बालोद्यान येथील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन मनपातर्फे आदरांजली वाहण्यात आली.

Popular Articles