spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान-पिपरीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

– नगरसेवक हरिष तिडके यांचे वेकोलि प्रशासनाला निवेदन

कन्हान :- शहरातील स्वामी विवेकानंद नगर, प्रभाग क्र. ८ येथे गेल्या दोन वर्षांपासुन पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येबाबत शिव सेनेचे नगरसेवक तथा गटनेते हरिष तिडके यांनी वेकोलि कामठी उपक्षेत्रीय प्रबंधक यांना निवेदन देऊन तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.

नगरपरिषद कन्हान-पिपरी अंतर्गत स्वामी विवेकानंद नगर परिसरात सुमारे ३ लाख लिटर क्षमते ची पिण्याच्या पाण्याची टाकी असुन गेल्या दहा वर्षां पासुन वेकोलि प्रशासनाकडुन या टाकीसाठी फिल्टर प्लांटसह पाणीपुरवठा करण्यात येत होता. मात्र मागिल दोन वर्षांपासुन हा पाणीपुरवठा पूर्णतः बंद करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

निवेदनात नगरसेवक तिडके यांनी नमुद केले आहे की, कन्हान-पिपरी परिसरात दरवर्षी उन्हाळ्यात तीन ते चार महिने तीव्र पाणीटंचाई भासते. आता उन्हाळ्याची सुरुवात होत असल्याने ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. करिता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी बंद असलेला पाणी पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवेदनाची प्रत कामठी उप क्षेत्रिय सिव्हिल विभागाला देखिल माहितीस पाठवि ण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेत ल्यास नागरिकांच्या संतापाला सामोरे जावे लागेल, दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल, असा इशारा नागरिकां कडुन दिला जात असुन वेकोलि प्रशासन या मागणी वर काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण कन्हान-पिपरी शहराचे लक्ष लागले आहे.

Popular Articles