spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैधरीत्या पेट्रोलची साठवणूक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा नोंद

सावनेर :- सागर खर्डे, सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी, सावनेर उपविभाग यांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, आर. के. बार जवळ सावनेर येथे जगजिवन डोमाजी हनवते, रा. वार्ड क ०१, पंचशिल नगर, सावनेर याने स्वतःचे फायदया करीता अवैधरित्या अत्यावश्यक वस्तु पेट्रोल चा साठा करून ठेवला आहे. तसेच अनाधिकृत विनापरवाना एका पडक्या दुकानात पेट्रोल साठवुन विकी करीत आहे. अशी माहीती प्राप्त होताच श्री सागर खर्डे यांनी सावनेर पोलीस आणि उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालय, सावनेर येथील अधिकारी आणि अंमलदारांना कारवाईचे आदेश दिले. नमुद पथकाने आर के बार जवळ सावनेर येथे पोहचुन धाड टाकली असता एका पडक्या दुकानात एक इसम दिसला तो पोलसांना पाहुन पळुन जात असतांना पोलीसांनी त्याला शिताफिने पकडुन त्याचे नाव पत्ता विचारले असता आरोपी नामे जगजिवन डोमाजी हनवते, वय ५५ वर्ष, रा. वार्ड क ०१, पंचशिल नगर, सावनेर असे नाव समजले. नमुद आरोपी हा अवैधरीत्या विनापरवाना पेट्रोल स्वतः जवळ बाळगुन विक्री करतांना मिळुन आला. आरोपीस पेट्रोल विकी करणे बाबत परवाना विचारला असता कोणताही परवाना नसल्याचे सांगीतले.

पोलीसांनी पंचासमक्ष आरोपीचे ताब्यातून ०३ नग प्लॉस्टीक कॅन मध्ये अंदाजे १२ लिटर पेट्रोल आणि प्लॅस्टीकची चाळणी असा एकुण १.२९८/- रुपयाचा मुददेमाल जप्त केला आहे.

Popular Articles