spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर कोषागारतर्फे पेंशन अदालत

नागपूर :- जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे नुकतेच पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. निवृत्ती वेतनाची प्रकरणे महालेखापाल कार्यालयाला सादर करताना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. महालेखापाल कार्यालयाच्या वरिष्ठ् लेखाधिकारी श्रीमती संध्या देशपांडे यांनी, निवृत्ती वेतन प्रकरणे सादर करताना घेण्याची दक्षता, त्यासंबंधीचे नमुने, शासन निणर्यातील तरतुदी याबाबत उपस्थित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. विविध कार्यालयांचे जवळपास २५० ते ३०० प्रतिनिधी तसेच निवृत्तीवेतनधारक या कायर्शाळेत सहभागी झाले होते.

वरिष्ठ कोषागार अधिकारी मोनाली भोयर, अप्पर कोषागार अधिकारी शुभांगी धुर्वे यांनी निवृत्तीवेतनधारकांच्या अडचणींचे निराकरण केले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी कोषागार कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह महालेखापाल कार्यालयाच्या श्यामला रमेश व इतरांनी परिश्रम घेतले असल्याचे वरिष्ठ कोषागार अधिकारी मोनाली भोयर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Popular Articles