spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 45 प्रकरणांची नोंद

– उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

 नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे. सोमवार (ता. 09) शोध पथकाने 45 प्रकरणांची नोंद करून 33,600 रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी थुंकणे (रू. 200 दंड) या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 200 रूपयांची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता करणे (रु. 400 दंड) या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 3,600 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रू. 400 दंड) या अंतर्गत 3 प्रकरणाची नोंद करून 1,200 रूपयांची वसुली करण्यात आली.

मॉल, उपहारगृहे, लाँजिग, बोर्डिंगचे हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2,000 रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 7,000 रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता यांनी त्यांचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 1,000 रूपयाची वसुली करण्यात आली. सार्वजनिक रस्ता, फुटपाथ,मोकळी जागा इत्यादी ठिकाणी कचरा बांधकामाचा मलबा/टाकावू कचरा टाकणे/साठवणे, प्रथम 48 तासात हटविणे या अंतर्गत 1 प्रकरणाची नोंद करून 5,000 रूपयाची वसुली करण्यात आली. हॉटेल मध्ये डिसेलटींग चेम्बर नसल्याने, चोक झाल्यावर रस्त्यावर घाण पसरवणे, कचरा शुल्क न भरणे व कचरा अन्य ठिकाणी फेकणे या अंतर्गत 2 प्रकरणाची नोंद करुन 10,000 रुपयाची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 18 प्रकरणांची नोंद करून 3,600 दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत जी.पी कंस्ट्रक्शन व सचिन अग्रवाल यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे प्रत्येकी रु.10,000 प्रमाणे असे एकूण रु.20,000 चे दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. डेल्टा डेव्लपर्स यांनी बांधकामाचे जागेवर घाण पाणी साठवून ठेवल्याबद्दल रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आले. धरमपेठ झोन अंतर्गत मे. सई अर्नव रियालिटी यांनी रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रु. 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. माफिया लॅन्डस रेस्टॉरेंट यांनी चेंबर ब्लॉक केल्यामुळे रु. 5,000 चे दंड वसुल करण्यात आले. गांधीबाग झोन अंतर्गत मे. श्री. दुर्गा ऑटोमोबाईल यांनी परवानगीशिवाय सीवर लाईनला बेकायदेशीरपणे जोडणी केल्यामुळे जवळच्या रस्त्याचे नुकसान झाल्याबद्दल . 10,000 चे दंड वसुल करण्यात आले. तसेच मे. अरविंद स्वीट्स भंडार यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसूल करण्यात आले. सतरंजीपूरा झोन अंतर्गत मे. भोले शंकर स्वीट्स यांनी प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000 दंड वसूल करण्यात आले. लकडगंज झोन अंतर्गत राजेश बाहेरा यांनी बांधकाम साहित्याचा कचरा रस्त्यालगत टाकल्यामुळे रु. 5,000 दंड वसूल करण्यात आले. उपद्रव शोध पथकाने 09 प्रकरणांची नोंद करून रू. 65,000 दंड वसुल केला.

Popular Articles