spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रभाग क्र 6 च्या स्वच्छतेसाठी नगरसेविका दिव्या गायधने सरसावल्या

– प्रभाग क्र 6 च्या नाल्याच्या सौंदर्यीकरणाच्या  मागणीसाठी नगराध्यक्ष यांना निवेदन सादर

कामठी :- कामठी नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र 6 ला स्वच्छ,सुंदर आणि आरोग्यदायी बनविण्यासाठी नगरसेविका दिव्या कपिल गायधने यांनी ठोस आणि कठोर पाउल उचलले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाच्या या भावनेला मूर्त स्वरूप देताना केवळ घोषणावर लक्ष केंद्रित न करता कठोर आणि प्रभावी अंमलबजावणीवर भर देणार असून प्रभाग क्र 6 अंतर्गत येणाऱ्या हमालपुरा नाला,जुनी ओली नाला,काटी ओली नाला,लाला ओली नाला,कोळसा टाल नाला चे सौंदर्यीकरण करून सुरक्षत्मक दृष्टिकोनातून नागपूर च्या नाल्याच्या धर्तीवर येथील नाल्यावर संरक्षक जाळी बसविण्यात यावी अशी मागणी नगरसेविका दिव्या कपिल गायधने यांनी नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांना दिलेल्या निवेदनातून केली.

या नाल्यावर संरक्षण जाळी बसविल्यास नाल्यात कचरा घालणार नाही ज्यामुळे दुर्गंधी होणार नाही व नागरिकाची सुरक्षा होईल व स्वछता कायम राहिल तसेच हे कार्य स्वछ भारत अभियान अंतर्गत शहर विकास कार्यासाठी एक पाउल पुढे ठरणार आहे.यावर नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी सहमती दर्शवित लवकरच हा विषय आगामी सभेत मंजूर करण्यात येईल असे आश्वासित केले.

Popular Articles