spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गजानन धाम तपोभूमी सिहोरा येथे गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा

हंसराज, प्रतिनिधी भंडारा सिहोरा, दि. १० :- गजानन धाम तपोभूमी म्हणून ओळख असलेल्या सिहोरा येथील गजानन मंदिरात गजानन महाराजांचा प्रकट दिन दोन दिवस भक्तिभावात साजरा करण्यात आला. ७ फेब्रुवारी रोजी गावातून गजानन महाराजांच्या पालखीचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी ह.भ.प. महादेव नंदरधने महाराज (सिंदपुरी) यांच्या पाच दिवसीय भागवत हरिपाठाचे आयोजन झाले होते.

८ फेब्रुवारी रोजी गोपालकाला किर्तन, दहीकाला व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सिहोरा व परिसरातील विविध गावांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गजानन धाम तपोभूमी सिहोरा ही संतांची भूमी असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज येथे येऊन गेल्याचा उल्लेख किर्तनातून करण्यात आला.

Popular Articles