कन्हान :- ग्राम पंचायत खंडाळा (घटाटे) ता. पारशिवनी जि. नागपुर येथे परिवर्तन महिला ग्रामसंघ व ग्राम पंचायत खंडाळा (घटाटे) यांच्या सयुक्त विद्यमाने भव्य महिला मेळाव्याचे आयोजित करून थाटात साजरा करण्यात आला.
सोमवार (दि.९) फेब्रुवारी २०२६ ला ग्राम पंचायत खंडाळा येथे ग्रा प सरपंचा विमल बोरकुटे यांच्या अध्यक्षेत पंचायत समिती पारशिवनी खंड विकास अधिकारी सुभाष जाधव यांचे हस्ते भव्य महिला मेळाव्याचे उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी उपसरपंच चेतन कुंभलकर, ग्रा पं सदस्य रविंद्र केने, वर्षा नागपुरे, संगिता वाघमारे, ग्राम विस्तार अधिकारी विनायक गहाणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

परिवर्तन महिला ग्रामसंघ व ग्राम पंचायत खंडाळा (घटाटे) व्दारे आयोजित भव्य महिला मेळावा कार्यक्रमांतर्गत पंचायत समिती पारशिवनी उमेद चा वतीने विविध स्पर्धा व मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. याप्रसंगी पारशिवनी गट विकास अधिकारी जाधव यांनी मौलिक असे मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, महिला सक्षमीकरण, पालकांचे कर्तव्य, शाळा, शासकीय योजना ची माहिती देण्यात आली. उमेद चे युवराज पाटोळे, अंकुश शुक्ला, सुवर्णलता दिवटे, उज्वला मारबते तसेच बाहेरील समुदाय संशोधन व्यक्ती मोनाली दुनेदार आणि उज्वला मारबते हयानी आर्थिक साक्षरता या विषयावर मार्गदर्शन केले. ग्रा पं कार्यालय कडुन घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ३०० कचरा कुंड्या वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमास ३०० महिला उपस्थित होत्या. आभार प्रदर्शन वैशाली उके सीआरपी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ग्रामसंघ अध्यक्ष सारिका नागपुरे, सचिव रोशनी गावंडे, सुरेखा वानखेडे तसेच महिला बचत गटाचे संगिता चौधरी, सारिका चौधरी, प्रियांका हटवार, वैशाली चानकापुरे, दुर्गाबाई नागपुरे, सुनिता केने, अर्चना चकोले, प्रिया वानखेडे सह इतर महिलांनी सहकार्य केले.
सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत चे सरपंच विमल बोरकुटे, उपसरपंच चेतन कुंभलकर, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र केने, वर्षा नागपुरे, संगीता वाघमारे, ग्रामपंचायत अधिकारी विनायक गहाणे यांनी मार्गदर्शन केले.








