नागपूर :- विदर्भाचे आराध्य दैवत संत गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा नुकताच महाकाली नगरात मोठ्या उत्साहात पार पडला. महाकाली नगर, अध्यापक नगर, महिला मंडळ यांनी भजन, कीर्तन, पालखी याचे आयोजन केलेले होते. त्यामध्ये महिला, लहान मुलं, युवा, यांनी सहभाग घेतलेला होता. अत्यंत आनंदाने कार्यक्रम संपन्न झाला व महाप्रसादाचा लाभ सर्व नागरिकांनी घेतला. यावेळी आशिष काळे, ऋषभ धारपुरे, नरेंद्र डोमके, स्वप्निल नरसिंगकर, प्रशांत पठाडे, अखिल हिरास व देवराव प्रधान यांनी परिश्रम घेतलेत.








