spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

न्यू ॲपोस्टोलिक इंग्लिश हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आणि संस्थापक दिन उत्साहात साजरा

नागपूर :- न्यू ॲपोस्टोलिक इंग्लिश स्कूलने विविधतेत एकता या संकल्पनेवर आधारित आपला वार्षिक स्नेहसंमेलन आणि संस्थापक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठित पाहुण्यांच्या आगमनाने झाली. प्रदीप हेडाऊ, माजी मुख्य आयकर आयुक्त, आयआरएस छत्तीसगड आणि मध्य प्रदेश,  सीमा हेडाऊ &- कलाकार अंकशास्त्रज्ञ आणि वास्तुशास्त्र तज्ञ सतीश रणीत आरएसआय रेल्वे पोलीस- पांडुरंग माने & एपीआय रेल्वे पोलीस, राजीव नामपल्लीवार, प्राचार्य डॉ. विनिता बोवर आणि मुख्याध्यापिका डॉ- वंदना बेंजामिन यांनी पाहुण्यांचे हार्दिक स्वागत केले आणि पाहुण्यांचे पारंपरिक लेझीमच्या सादरीकरणाने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पालक माजी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. ज्याने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. शाळेचे संस्थापक कै. बिशप डॉ. व्हिन्सेंट बोवर आणि कै.ॲलिस बोवर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. पाहुण्यांचा परिचय धनलक्ष्मी सुरेश यांनी करून दिला. पाहुण्यांचे भेटवस्तू आणि सुंदर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. हायस्कूल विभागाच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. त्यानंतर मुख्याध्यापिका डॉ. विनिता बोवर यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला. प्रमुख पाहुणे प्रदीप हेडाऊ यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले- त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले आणि प्रेरणा दिली. नर्सरी ते ज्युनियर कॉलेज पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक सादरी करणातून आपली प्रतिभा सादर केली आणि विविधतेत एकता या संकल्पनेद्वारे संदेश दिला. भारताच्या विविध राज्यांची संस्कृती आणि परंपरा दर्शविणाऱ्या रंगीबेरंगी आणि उत्साही नृत्यांद्वारे मिनी इंडिया सादर करण्यात आला- भुई नृत्य, भांगडा नृत्य, बंगाली, राजस्थानी, लावणी नृत्य, गोंडी नृत्य इत्यादी सादरीकरणाचे सर्वांनी खूप कौतुक केले. चिमुकल्या मुलांचे सादरीकरण हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. मान्यवर आणि पालकांनी विद्यार्थी] कर्मचारी आणि व्यवस्थापनाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेधा भांडारकर यांनी केले आणि आभार प्रदर्शन स्वाती चांदे यांनी केले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

Popular Articles