कन्हान :- जगतगुरू तुकाराम महाराज, छत्रपती शिवराय व संत गाडगे बाबा यांच्या सयुक्त जयंती उत्सवा निमित्य मराठा सेवा संघ कन्हान व्दारे शनिवार (दि.२१) फेब्रुवारी ला डोणेकर सभागृह कन्हान येथे अखिल कुणबी समाज स्नेह मेळावा आयोजित केला आहे.
शनिवार (दि.२१) फेब्रुवारी २०२६ ला दुपारी २ वाजता डोणेकर सभागृह जे एन रोड कन्हान येथे जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची (दि.२) फेब्रुवारी ४१८ वी जयंती, महाराष्टाचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची (दि.१९) फेब्रुवारी ३९६ वी जयंती आणि संत गाडगेबाबा यांची (दि.२३) फेब्रुवारी १५० वी जयंतीचे औचित्य साधुन मराठा सेवा संघ कन्हान व्दारे या महापुरूषांच्या सयुक्त जयंती निमित्य अखिल कुणबी समाज स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्याच आले आहे. मेळाव्याचे अध्यक्ष – शिवश्री मधुकर मेहकरे राष्ट्रीय महासचिव मराठा सेवा संघ, उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शन – शिवश्री दिलीप चौधरी सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापिठ, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड चंद्रपुर, प्रमुख अतिथी- शिवश्री प्रकाश जाधव माजी खासदार, संस्थापक अध्यक्ष ग्रामौ न्नती प्रतिष्ठाण, शिवश्री प्रमोद वैद्य मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष नागपुर, शिवश्री किशोर वानखेडे संचालक साईबाबा आश्रमशाळा टेकाडी यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार असुन यात कर्तुत्वान व गुणवंताचा सत्कार आणि कुणबी समाजाला विशेष मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच आपल्या परिवारातील प्रमु़ख व्यक्तीला परिवाराचा परिचय देता येईल. त्यामुळे आपली ओळख मजबुत होईल. कुणबी समाज संघटित होऊन अधिक उन्नती करता येईल. या ध्येय्याने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
” शिवराय मना मनात, शिवजयती घरा घरात “
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तारखे नुसार १९ फेब्रुवारी ला जगभरात मोठया उत्साहाने साजरी केली जाते. ह्यासाठी मराठा सेवा संघाचे विशेष प्रयत्न आहे. आता सार्वजनिक महोत्सव झाला आहे. १९ फेब्रुवारी ला सर्व शिवप्रेमीनी आपआपल्या घरावर भगवा झेंडा लावुन प्रथमत: आपल्याच घरी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शिवराय जयंती महोत्सव उत्साहाने साजरा करू या.
” एकमेकां साहय करू, अवघे धरू सुपंथ ”
करिता आपण साथ द्या, सहभाग करा, संघटित व्हा. आपण सहकार्य करून महापुरूषाची सयुक्त जयंती उत्सव आणि अखिल कुणबी समाजाचा स्नेह मेळाव्यास कन्हान परिसरातील समाज बांधवानी बहु संख्येने सहकुटुंब उपस्थित राहावे.








