spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चिचाळा येथील शेतकऱ्यांचा गोठ्याला भीषण आग

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- तालुक्यातील चिचाळा येथील शेतकरी अनिल लिल्हारे (वय ३५वर्ष) यांच्या घरालगत असलेल्या जनावरांच्या गोठ्याला शुक्रवारी (दि.२७) फेब्रुवारीचे मध्यरात्री सुमारे २.४५ वाजता अचानक आग लागली. या आगीत शेतकऱ्याचे सुमारे ६० हजार रुपयांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शेतकरी लिल्हारे यांनी दिलेल्या माहितीनुसार आगीत हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एमएच-३१-बीझेड-६८८५ आणि बजाज डिस्कव्हर दुचाकी क्रमांक एमएच -४९-एक्स -५७१० यांच्या २ टायर पूर्णतः जळून खाक झाले असून वाहनांचे काही भागही जळाले. याशिवाय पिकांना पाणी देण्यासाठी ठेवलेले पाण्याचे इंजिन, ११ एमएमची सर्व्हिस वायर अंदाजे ११०० फूट, १८ बोरे जनावरांचा चारा, एक मोठा डेझर्ट कुलर, शेतातील सिंचनासाठी असलेली ३ एचपीची इलेक्ट्रिक पाण्याची मोटार, ५५ किलो तूर असलेला बोरा तसेच सुमारे १२० किलो बंध व इतर साहित्य आगीत नष्ट झाले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच शेतकरी अनिल शिवदयाल लिल्हारे यांनी सरपंच कविता ईश्वर बसिने तसेच चिचाळ्याचे तलाठी यांना तात्काळ कळविले. माहिती मिळताच तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.