नागपूर :- दि. १ मार्च २०२६ रोजी, Nagpur येथील वॉर्ड क्र. ३७ मध्ये, Radhe Mangalam Celebration Hall समोरील मैदान परिसरात भव्य स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.
✅ ७६८ किलो कचरा संकलित
✅ ६३ समर्पित स्वयंसेवक
✅ कृतीच कृती… गाजावाजा नाही
ही मोहिम Vrikshit Foundation Nagpur च्या स्वयंसेवकांनी व वॉर्ड क्र. ३७ च्या नगरसेविका निधी तेलगोटे यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पाडली.
ज्यांनी प्रत्यक्ष हजर राहून कचरा उचलला, वर्गीकरण केले आणि बदल हा केवळ पोस्ट नसून सहभाग असतो हे सिद्ध केले,त्या प्रत्येक सदस्याला मनःपूर्वक सलाम.
नागपूरला फक्त तक्रारींची गरज नाही.
नागपूरला पुढे नेणाऱ्या माणसांची गरज आहे.








