किशोर साहू :- सावित्रीबाई एकता बहुउद्देशीय शिक्षण संस्था दहेगाव द्वारा संचलित मानवता कान्व्हेंट येथे नुकताच वार्षिक स्नेहसंमेलन चा सोहळा उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत लेझी नृत्याद्वारे करण्यात आले.पाहुण्यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. क्रांती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा ज्योतिबा फुले ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार घालून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष मानवता कॉन्व्हेंट चे अध्यक्ष दामोधर आंबिलढुके ,कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सरपंच गट ग्रामपंचायत दहेगाव भारती संदिप आंबिलढुके ,सह उद्घाटक म्हणून अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती भोवरी अंकुश निरगुडकर ,गट ग्रामपंचायत चे उपसरपंच रवींद्र ढोमणे ,तंटामुक्तीचे अध्यक्ष भगवान आंबीलढुके , कॉन्व्हेंट चे सचिव उत्तम देशमुख ,कोषाध्यक्ष रवींद्र मेहर, पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव मुख्याध्यापक वासुदेव भुते, अध्यक्ष नितेश इंगळे ,उपाध्यक्ष रणधीर आंबिलढुके, शेषराव आंबिलढुके , संदिप आंबिलढुके,ग्यानिवंत वैद्य, हेमराज वासनिक,सदुकर हटवार , जि प शाळा भोवरी मुख्याध्यापिका पठाण तब्बसून,गट ग्रामपंचायत दहेगाव चे सर्व सदस्यगण, शाळा व्यवस्थापन समिती दहेगाव येथील सर्व सदस्य गण ,मानवता कॉन्व्हेंट दहेगाव येथील सर्व सदस्य गण या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी कॉन्व्हेंट मध्ये घेण्यात आलेल्या विविध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी मिथुन जाधव, आर्यन नामदेव घडोले यांना पारितोषिके देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी केजी वन ,केजी टू च्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर सुंदर नृत्य केले .शिवाजी महाराजांच्या वेशभूषात असलेला शिवबा संदीप आबिलढुके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषात असलेला अन्वित राजकुमार हटवार दोघेही या स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी खुप आकर्षित दिसत होते. या स्नेहसंमेलनात विविध नृत्य, देशभक्तीपर नृत्य ,सामाजिक नृत्य , नाटकांचे लहान लहान विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे सादरीकरण केले .
स्नेहसंमेलन उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी कॉन्व्हेंट मधील पोर्णिमा दैशमुख ,प्रगती आंबिलढुके, रीना देशमुख, भावना देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले .कार्यक्रमाचे संचालन कॉन्व्हेंट चे कोषाध्यक्ष रविंद्र मेहर यांनी केले .आभार प्रदर्शन कॉन्व्हेंट चे सचिव उत्तम देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप वंदेमातरम या गिताने करण्यात आले. कॉन्व्हेंट मधील केजी वन आणि केजी टू च्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकरीतून उत्कृष्ट नृत्य सादर करून दहेगावतील जनतेचं लक्ष केंद्रित केले. त्यामुळे कॉन्व्हेंटच्या सर्व संचालकाचे , सर्व शिक्षकांचे ग्रामवासियांनी कौतुक केले.








