spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उद्या “अस्मिता महिला” लीग स्पर्धा

Ø मेरा युवा भारत व्दारा आयोजन

 यवतमाळ :- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रविवारी दि. 8 मार्चला सकाळी 7 वाजता नेहरु स्टेडीअम, गोधणी रोड, यवतमाळ येथे अस्मिता महिला” लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा केंद्र सरकारच्या मेरा युवा भारत, युवा कार्यक्रम विभाग यवतमाळ, खेलो इंडिआ, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, भारत स्काऊट व गाईड कार्यालय, एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.

महिला दिनानिमित्त वयोगट 13 वर्ष, 13 ते 18 व 18 ते 29 या वयोगटातील युवती करीता 100 मिटर, 200 मिटर, 400 मिटर दौड स्पर्धा व मनोरंजनात्मक स्पर्धेचे आयोजन खास युवती करीता करण्यात आलेले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याकरीता अस्मिता पोर्टलवर आपले रजिष्ट्रेशन करणे अनिवार्य असून ज्यांनी रजिष्ट्रेशन केले आहे त्यांना या स्पर्धे मध्ये सहभागी होवून पोर्टल व्दारे आपले प्रमाणपत्र सुध्दा डाऊनलोड करता येणार आहे. त्याकरिता https://nses.kheloindia.gov.in किंवा https://mybharat.gov.in या लिंकवर जाऊन आपली नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेमध्ये शाळा, महाविद्यालय, क्रीडा असोसिएशन, युवा मंडळ, महिला मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना, भारत स्काऊट गाईड, एनसीसी व इतर संस्थाच्या महिला युवती नोंदणी करुन सहभागी होवू शकतात. विजेता स्पर्धकास मेडल व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

यवतमाळ मधील सर्व खेडाळू, शालेय तसेच महाविद्यालयातील युवतींनी या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी केले आहे.

Popular Articles