spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

निमखेडा येथे आज भव्य हिंदू संमेलन

किशोर साहू :- यंदा संपूर्ण भारतात गटा तटात विखुरलेल्या हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी मागील एक महिन्यापूर्वीपासून ठिकठिकाणी भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. निमखेडा येथेही आयोजक सकल हिंदू समाजातर्फे शनिवार (ता. 7 मार्च)ला दुपारी दोन ते सात वाजेपर्यंत जिल्हा परिषद शाळा मैदान येथे भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

इजनी (धर्मापुरी) सुर संगम सिद्ध आश्रम येथील महंत छोटे बालकदास महानत्यागी यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी दोन वाजता पासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत गौपूजन, कलश यात्रा,दिंडी,हनुमानचालीसा, भजन ,सांस्कृतिक कार्यक्रम वक्त्यांचे भाषण, भारतमातेची आरती व समारोप महाप्रसादाने होणार आहे.

या संमेलनाला प्रमुख वक्ते म्हणून रामटेक विभाग संयोजक ,भारतीय विचार मंचचे संजय जोशी उपस्थित राहणार आहेत. ते पंच परिवर्तन म्हणजे नागरिक कर्तव्य, स्वदेशी, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण आणि सामाजिक समरसता यावर मार्गदर्शन करणार आहेत. या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून मौदा येथील महानुभाव पंथाचे प.पू.सुकेंद्र मुनी दादा पंजाबी, परमात्मा एक मार्गदर्शक निलेश कुंभरे, प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय मौदा येथील ब्रह्मकुमारी अर्चना दीदी ,वारकरी संप्रदायाचे पद्माकर तांबुलकर महाराज सह हिंदू समाजाचे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे.

तरी या भव्य हिंदू संमेलनाला विविध गटातटात विखुरलेल्या हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आले आहे.

Popular Articles