spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मांग-गारोडी मित्र परिवार व्दारे श्रीसाई पालखी पदयात्रेचे भव्य स्वागत

कन्हान :- मांग-गारोडी मित्र परिवार व्दारे कन्हान ते शिर्डी श्रीसाई पालखी पदयात्रेचे फुलांचा वर्षावात विधीवत पुजा, अर्चना करुन पालखी पदयात्रेत सह भागी भाविकांचे स्वागत करून भाविकांना पिण्याचे पाणी बॉटल, फराळी पॉकेट, फळ वितरण करून पालखी पदयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले.

गांधी चौक कन्हान येथे मांग-गारोडी मित्र परिवार व्दारे कन्हान ते शिर्डी श्रीसाई पालखी पदयात्रे चे फुलांचा वर्षाव करित स्वागत करून विधीवत पुजा, अर्चना करुन पालखी पदयात्रेत सहभागी भाविक भक्तावर फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले . भाविकांना पिण्याचे पाणी बॉटल, फराळी पॉकेट, फळ वितरण करून भव्य स्वागत करित यात्रेकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यकर्माच्या यशस्विते करिता नेवालाल पात्रे, सावन लोंढे, रामजी पात्रे, विकी खडसे, सुधाकर शेंडे, गुरुदेव काबले, अर्जुन पात्रे, सतिश नाडे, कपली लोंढे, आशिष इंचुलकर, विनोद पात्रे, आजु गायकवाड, चंदन पात्रे, वीर गायकवाड, बिजेश पात्रे, जुग्णु लोंढे, केसर लोंढे, मीरा गायकवाड, सरिका पात्रे, ननु गायकवाड आदीनी परिश्रम घेतले.

Popular Articles