– “जय साईराम” च्या जयघोषाने कन्हान शहर निनांदुन चौकाचौकात भव्य स्वागत
कन्हान :- श्री राम नवमी उत्सव निमित्त श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान व्दारे भव्य साई पालखी पदयात्रा १६ व्या वर्षी आयोजित करण्यात आली. यात्रेत हजारो साई भक्त भक्ती आणि श्रद्धेने सहभागी होऊं शिर्डीला रवाना झाले. यात्रे दरम्यान संपुर्ण शहर “जय साईराम” चा जयघोषाने निनांदुन परिसरात भक्तीमय वातावरणात कन्हान शहर न्हावुन गेले होते.
गुरुवार (दि.५) मार्च ला सकाळी १० वाजता इंदिरा नगर येथील साई मंदिरात श्री साई पालखीचे विधीवत अभिषेक, पूजा, अर्चना आणि आरती करण्यात आली. त्यानंतर अजय ठाकरे, साई ठाकरे, भार्गव ठाकरे, शकुंतला ठाकरे, रूपाली ठाकरे, ज्योती ठाकरे आणि रिधम वानखेडे यांनी पालखी यात्रेत सह भागी होणाऱ्या भाविकांना अन्नदान केले. साईंच्या नावाच्या स्तोत्रांसह पालखी साई मंदिरातुन निघाली आणि तारसा रोड मार्गाने भ्रमण करुन संत तुकाराम मंदिर तुकाराम नगर ला पोहचताच पालखी यात्रेचे भव्य स्वागत व दर्शन करून भाविकांनी जगतगुरु संत तुकाराम महाराजांना आदरांजली वाहिली.

त्यानंतर पालखी तारसा रोडने, गहुहिवरा चौक, शहीद प्रकाश देशमुख चौक, छत्रपती शिवाजी महाराज तारसा रोड चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि गांधी चौक मार्गे भ्रमण करित कन्हान नदीच्या पुलावरून आडापुल येथील साई मंदिरात पोहोचली. दर्शनानंतर पालखी कामठी- नागपुर मार्गाने शिर्डीला रवाना झाली . यात्रे दरम्यान संत तुकाराम मंदीर समिती, तुकाराम नगर कन्हान, मराठा सेवा संघ कन्हान, राष्ट्रीय महामा र्गावर मीना कळंबे मित्र परिवार आणि विविध सामा जिक संस्था आणि भाविकांनी फुलाच्या वर्षाने, फळ आणि शरबत वितरण करुन साई भक्तांचे जल्लोषात स्वागत केले. ही २१ दिवसांची पालखी पदयात्रा विवि ध गावांना भेट देत दि.२५ मार्च ला सायंकाळी सुनिल लक्ष्मण भाबड यांचे निवासस्थानी मु. जेऊर कुंभारी ता. कोपरगाव जि. अहमदनगर येथे मुक्काम. गुरूवार दि.२६ मार्च ला श्री साई पालखी निवारा निमगाव येथुन भव्य मिरवणुक खंडोबा मंदीर ते समाधी मंदीर शिर्डी येथे श्रीराम जन्म उत्सव सोहळा प्रारंभ. सायंका ळी श्री साई पालखी पदयात्रा परती करिता शिर्डी ते कन्हान प्रस्थान करेल.
कन्हान ते शिर्डी श्री साई पालखी पदयात्रेत मनोज चिकटे, अजय ठाकरे, अविनाश रायपुरे, गणेश हटवार, गौरव गिरडकर, बंटी डाफ, अजय शेंदरे, प्रमोद काकडे, रेहाण खडसे, दिनेश खोडे, पंकज करंडे,करण तेलोते, अनिल बावनकुळे, गणेश गायकवाड सह ५१ साई भक्त सहभागी असुन श्री साईराम पालखी सोह ळा समिती कन्हानचे सर्व भाविक मंडळी परिश्रम करित सहकार्य करित आहे.








