spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सर्वसमावेशक विकासाचा दूरदर्शी अर्थसंकल्प

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा ‘विकसित महाराष्ट्र’ घडवण्याच्या दिशेने टाकलेले दूरदर्शी आणि ठोस पाऊल आहे. तंत्रज्ञानावर आधारित विकास, पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर पदभरती यामुळे राज्याच्या प्रगतीला नवी चालना मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन भत्ता तसेच शेती क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदींमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेली लाडकी बहीण योजना पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय हा अत्यंत स्वागतार्ह आहे.

उद्योग, तंत्रज्ञान, आरोग्य, शेती आणि रोजगार या सर्व क्षेत्रांचा समतोल साधणारा हा अर्थसंकल्प निश्चितच महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

– डॉ. वैशाली चोपडे, नागपूर

Popular Articles