शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 रोजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा राज्याच्या आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, शेती, एमएसएमई क्षेत्र आणि रोजगारनिर्मिती यावर विशेष भर देण्यात आला आहे. जे राज्यातील व्यापारी व उद्योग समुदायासाठी सकारात्मक संख्येत देणारे आहे. महाराष्ट्र आजही भारताची सर्वात मोठी राज्य अर्थव्यवस्था आहे. राज्याची अर्थव्यवस्था सुमारे Rs. 49 – 51 लाख कोटी इतकी असून देशातील GDP मध्ये सुमारे 14 टक्के योगदान देते. तसेच राज्यात 2024 -25 मध्ये रुपये 1.64 लाख कोटी इतकी परकीय गुंतवणूक (FDI)आली असून ती देशातील एकूण गुंतूवणुकी पैकी सुमारे 39 टक्के आहे. व्यापार आणि उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने पायाभूत सुविधांवरील भर हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. मुंबईतील मेट्रो विस्तार कोस्टल रोड प्रकल्प आणि राज्यातील रस्ते व कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक सुलभ होऊन लॉजिस्टिक खर्च कमी होण्यास आणि व्यापार साखळी अधिक वेगवान होण्यास मदत होईल. शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला पण देण्यासाठी सरकारने 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आणि वेळेवर परतफेड करण्यासाठी 50000 हजार प्रोत्साहन अशी महत्त्वाची घोषणा केली आहे. तसेच 7.5 HP पर्यंतच्या पंप धारक शेतकऱ्यांसाठी सुमारे 20 लाख कोटीच्या विजबिल सवलत कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. ग्रामीण उत्पन्न वाढल्यास त्याचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठा किरकोळ व्यापार आणि लघु उद्योगावर होतो त्यामुळे हा निर्णय व्यापार क्षेत्रासाठी ही सकारात्मक आहे एम एस एम ई क्षेत्राच्या दृष्टीने महाराष्ट्र आदित देशातील अग्रगण्य राज्य आहे राज्य सरकारने व्यवसाय सुरूभक्त वाढविण्यासाठी मैत्री सिंगल विंडो प्रणाली द्वारे 200 पेक्षा अधिक परवानगी आणि सेवांचे डिजिटायझेशन केले आहे ज्यामुळे उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे तसेच सरकारकडून एम एस एम ई क्षेत्राला वित्तीय सहाय्य आणि व्यवसाय वाढीसाठी प्रोत्साहन देण्याचा भर या अर्थसंकल्पात दिसून येतो. राज्यातील गुंतवणूक वाढवण्याच्या प्रयत्नामुळे आणि उद्योग वाढीच्या धोरणामुळे पुढील काही वर्षात सुमारे 40 लाख रोजगार निर्मितीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे ज्यांचा लाभ व्यापारी उद्योग आणि सेवा क्षेत्राला होऊ शकतो. सीएआयटीच्या दृष्टीने महाराष्ट्राचा हा अर्थसंकल्प व्यापारी लघुउद्योग शेतकरी आणि ग्राहक यांना जोडणारा विकास भिमुख आर्थिक आराखडा आहे पायाभूत सुविधा शेती उद्योग आणि तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रांमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे राज्यातील व्यापार वातावरण अधिक सक्षम होईल आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला निश्चितच नवी गती मिळेल असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे श्वेताली ठाकरे यांनी कळविले आहे.








