नागपूर :- बारूद फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या रुग्णांची पाहणी करण्यासाठी खासदार शामकुमार बर्वे तसेच महाराष्ट्र राज्य बारूद फॅक्टरी मजदूर संघटनेचे अध्यक्ष स्वप्निल वानखेडे दि. ६ मार्च २०२६ रोजी रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी जखमी कामगारांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि आवश्यक उपचार तसेच मदत तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाशी चर्चा केली. याप्रसंगी त्यांनी जखमींना धीर देत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या घटनेबाबत सखोल चौकशी करून कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली.
रुग्णांची पाहणी व जखमी कामगांराची भेट घेऊन ताबडतोब मदत होईलच ! प्रशासनाशी चर्चा – खासदार श्यामकुमार बर्वे









