spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोहाडीत बंद घर फोडून ८३ हजारांचा ऐवज लंपास

हंसराज,प्रतिनिधी भंडारा मोहाडी :- शहरातील राजेंद्र वॉर्ड भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोराने सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ८३,८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.

फिर्यादी तेजस्विनी महेश नवखरे (२६, रा. राजेंद्र वॉर्ड) या भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात नर्सिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. त्या कामावर असताना, त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मुलीने घराचा कुलूप तुटलेला असल्याचे फोनवरून सांगितले. तेजस्विनी यांनी घरी येऊन पाहिले असता, घरातील लोखंडी कपाटातून साडेतीन ग्रॅमची सोन्याची नथ, दीड ग्रॅमचे मिनी मंगळसूत्र, सोन्याचे मणी, अंगठी, पेंडंट आणि रोख १९,८०० रुपये असा एकूण ८३,८०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१ (३), ३०५ (१) अन्वये अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल चौधरी करीत आहेत.

Popular Articles