नागपूर :- गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी लोकमान्य सांस्कृतिक क्रीडा मंडळ व लोकजागृती मोर्चाच्या संयुक्त विद्यमाने तसेच अन्य सहयोगी संस्थांच्या पुढाकाराने सक्करदरा चौकात गुढीपाडवा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी ढोल ताशाच्या गजरात भारतीय नववर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. तसेच 31 फूट गुढीचे पूजन, शिवकालीन युद्ध प्रात्यक्षिके, सामूहिक रामरक्षा व महाआरती करण्यात येणार आहे.
याप्रसंगी महापौर, उपमहापौर व सक्करदरा परिसरातील सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीधर गाडगे, दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, सुप्रसिद्ध उद्योजक जयंत खळतकर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सामूहिक गुढीपूजन करावे व हिंदुत्वाचा हुंकार भरावा, असे आवाहन लोकजागृती मोर्चाचे अध्यक्ष ॲड. रमण सेनाड, ॲड. राजेंद्र गिल्लुरकर, आशुतोष शेंडे, संदीप वाघ, सुधीर सांगोळे, अतुल पोफळी, ॲड. ऋग्वेद सेनाड, प्रवीण घुले इत्यादी पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे.








