spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

२३ मार्च रोजी महाराष्ट्रातील सर्व आरटीओ कार्यालयांवर रिक्षा संघटनांची धडक; विविध मागण्यांसाठी देणार निवेदन

हंसराज, प्रतिनिधी भंडारा मुंबई :- ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटोरिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळा’च्या जाचक अटी आणि आरटीओ प्रशासनाच्या सक्तीविरोधात ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने एल्गार पुकारला आहे. या अन्यायाचा निषेध करण्यासाठी येत्या सोमवार, २३ मार्च २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या आरटीओ कार्यालयात निवेदन देण्यात येणार असल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली.

मुंबईतील गिरगाव येथे रविवारी (१५ मार्च) राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली.

प्रमुख मागण्या 

🔹 कल्याणकारी मंडळाच्या नोंदणीसाठी रिक्षाचालकांकडून ५०० रुपये प्रवेश शुल्क आणि ३०० रुपये वार्षिक शुल्क आकारण्याचा निर्णय अन्यायकारक असून तो त्वरित रद्द करावा.

🔹 अनेक आरटीओ कार्यालयांत मंडळाची नोंदणी केल्याशिवाय परमिट नूतनीकरण किंवा पासिंगची कामे अडवली जात आहेत. ही बेकायदेशीर सक्ती थांबवावी.

🔹 नियमित रिक्षा परवान्यांवर स्थगिती असताना इलेक्ट्रिक रिक्षांची नोंदणी मात्र सुरू आहे. शासनाच्या या दुटप्पी भूमिकेचा निषेध करत ई-रिक्षा नोंदणीवर स्थगिती आणण्याची मागणी करण्यात आली आहे.

या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २३ मार्च रोजी राज्यव्यापी ‘निवेदन सोहळा’ आयोजित केला जाणार असून, मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील सर्व संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत.

Popular Articles