सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- भारतीय जनता पार्टी देवलापार मंडळाची एक महत्त्वाची संघटनात्मक बैठक पवनी येथे घेण्यात आली. या बैठकीत आगामी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण शिबिरा’ची तयारी आणि रूपरेषा आखण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हा मंत्री अनिल निधान होते. ते बोलतांना म्हणाले की, समोरच्या भविष्यात मंडळ स्तरावर एक दिवसीय निवासी पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण कार्यशाळाचे आयोजन केले जाईल. पक्षाच्या कार्यकर्त्यांना वैचारिक स्पष्टता देणे आणि त्यांना संघटनात्मकदृष्ट्या अधिक सक्षम व सक्रिय बनवणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश राहील. बैठकीला भाजपचे वरिष्ठ पदाअधिकारी उपस्थित होते. जिल्हा महामंत्री राहुल किरपान आणि जिल्हा उपाध्यक्ष संजय मुलमुले यांनीही आपले विचार बैठकीत मांडले. यावेळी जिल्हामंत्री विशाल चावट, भाजपा देवलापार मंडळ्याचे अध्यक्ष राज हरणे, बंटी गुप्ता, रोशन भट्टी, लक्ष्मण केणे, पालोराच्या सरपंच छाया भट्टी आणि सारिका उइके उपस्थित होते. त्यांनी सक्रियपणे सहभाग घेवून या नियोजन बैठकीत संघटना बळकट करण्यावर भर देण्यात आला. बैठकीला वसंता कोकाटे, रोशन राजपाल, हेमंत जैन, शिवनारायण फुलबेल, मनीष मडावी, राजू दुबे, पंकज राजपाल, उत्तमलाल बांधिया, गणेश बगमारे, मनीष पारखी, गणवीर पारखी, सुरकता टेकाम, रितिका राऊत, वनिताताई, रामरतन गजभिये, पाशु मुश्ताक, मुन्ना सोडस्कर, दिलीप जिजोते, केशव मेहर, दुर्गाप्रसाद राऊत, सुमित वाडीवे, ऋषी कश्यप, भूमेश्वर मोरे, संजय कोकण, नितेश बमनोटे, शंकर कोकण, अनिल मसराम, विजू दीक्षित आदीसह मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष राज हरणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वसंता कोकाटे यांनी केले.








