spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कलाकार ,महिला भजन मंडळ यांचे कार्य उल्लेखनीय आहे – नगरसेविका परिणिता फुके 

– शाहीर कलाकार यांनी व्यसन मुक्त व्हावे– शाहीर राजेंद्र बावनकुळे 

कामठी :- भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया तर्फे जुने हनुमान मंदिर, भिलगाव येथे नुकतेच कलाकारांचा भव्य मेळावा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच पंकज साबळे,योगेश माकडे, भास्कर भनारे, कल्पना बांगडकर आणि प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले.माजी मंत्री आमदार परिणय फुके यांच्या परिणिता फुके नगरसेविका नागपूर यांनी आपल्या मार्गदर्शन मध्ये सांगितले की कलाकार आणि महिला भजन मंडळ यांचे कार्य उल्लेखनीय आहे,महिला भजनच्या माध्यमातून प्रबोधन,बेटी बचाव बेटी पढाव अश्या प्रकारे भजन गायन करीत आहे.शिवसेना नेते राधेश्याम हटवार,सुभाष घाटे,सरपंच पंकज साबळे, चंद्रशेखर आरगुलेवार ,मनोज जिभकाटे, गुणवंता माकडे,यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी मार्गदर्शन मध्ये सांगितले की शाहीर कलाकार यांनी व्यसन मुक्त व्हावे,तसेच कलाकारांच्या मागण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करीत आहे,आज जे कलाकार यांना पाच हजार रूपये महिना मानधन मिळत आहे,त्यासाठी आमच्या संस्थेने मोर्चे,उपोषण केले,यामध्ये सिंहाचा वाटा आहे असे सांगीतले.कार्यक्रमाचे आयोजक भास्कर भनारे, सौ कल्पना बांगडकर , योगेश माकडे यांनी यशस्वीरित्या संपन्न केले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शेखर सावरबांधे, सरपंच भावना फलके,सौ प्रणाली माकडे,प्रवीण त्रिवेदी, तुषार सातपुते, प्रेमशंकर तिवारी,भंडारा जिल्हा सचिव प्रेमलाल भोयर,गोंदिया जिल्हा अध्यक्ष विजय कुमार मेश्राम,भैय्यालाल माकडे,सौ अरुणा बावनकुळे, ग्राम पंचायत सदस्य शेखर वंजारी, रुपाली बांगडकर,पल्लवी चौधरी,रेणुराणी सोनी, राजेंद्र लेंडे, वृषाली शहारे,नैना देशभ्रतार,आशिष भनारे , स्वप्ना बोदेले, उषा उईके संचालन गणेश बांगडकर आभार भास्कर भनारे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगेश माकडे, अभिमन्यू बांगडकर, गजानन वडे,रमेश गणोरकर, गावातील सर्व महिला आणि पुरुष यांनी परिश्रम घेतले.

Popular Articles