spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पंच परिवर्तनाच्या माध्यमातून समाज परिवर्तन – श्रीकांत चितळे

– नागपुरात अयोध्या भागातील जानकी नगर वस्तीचे भव्य हिंदू सम्मेलन उत्साहात संपन्न

– विविध उपक्रमांमधून समाजजागृतीचा संदेश:

नागपूर :- सकल हिंदू समाज, नागपूर च्यावतीने शिवशक्ती नगर येथील श्री हनुमान मंदिर परिसरात १४ व १५ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेले भव्य हिंदू सम्मेलन मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले. दोन दिवस चाललेल्या या सम्मेलनात धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. कार्यक्रमाची सुरुवात भारत माता पूजन, गोमाता पूजन व आरतीने करण्यात आली. याप्रसंगी परिसरात राष्ट्रभक्ती व आध्यात्मिकतेचा संगम अनुभवायला मिळाला. संत गजानन महाराज पारायण, भजन तसेच विविध धार्मिक विधींनी कार्यक्रमाला अधिक उंची प्राप्त झाली. दुसऱ्या दिवशी काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शोभायात्रेमुळे परिसरात उत्साहाचे व धार्मिकतेचे वातावरण निर्माण झाले होते.

या सम्मेलनात विविध वयोगटांसाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेत “हिंदू सण” हा विषय देण्यात आला होता, ज्यात इयत्ता १ ली ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी रंगीत व कल्पक चित्रांद्वारे सणांचे सुंदर चित्रण केले. रांगोळी स्पर्धेचा विषय “हिंदू सण आणि परंपरा / महापुरुष गाथा” असा होता. या स्पर्धेत सर्व वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेत आकर्षक आणि अर्थपूर्ण रांगोळ्यांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची झलक साकारली. पथनाट्य स्पर्धेत “पंचपरिवर्तन” या संकल्पनेवर आधारित नागरी कर्तव्य, पर्यावरण संवर्धन, स्वदेशीचा आग्रह, कुटुंब प्रबोधन आणि सामाजिक समरसता या विषयांवर प्रभावी सादरीकरणे करण्यात आली. या सादरीकरणांनी उपस्थित प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडले. तसेच वक्तृत्व स्पर्धेत “हिंदू एकतेत मातृशक्तीची भूमिका” या विषयावर लहान मुलं, मुली व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपले विचार मांडले.मातृशक्तीच्या योगदानावर आधारित मांडणींना विशेष दाद मिळाली.

कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी संत श्री महादेव महाराज (आनंद गड), महिला वक्ता प्रा.कीर्तीताई कालमेघ (वनकर) आणि प्रमुख वक्ते म्हणून श्रीकांतजी चितळे होते. आपल्या उद्बोधनातून त्यांनी पंच परिवर्तन, सामाजिक परिवर्तन साठी कसे आवश्यक आहे आणि आपण स्वतः पासून सुरू करू तेव्हा समाजात प्रत्येक व्यक्ती त्याचं पालन करेल, आपल्या देशाला वैभव संपन्न करण्यासाठी सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, नागरी कर्तव्य पालन, स्व जागरण, आणि कुटुंब प्रबोधन यांच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे प्रा.किर्तीताई वनकर यांनी मुलांवर संस्कार करतांना आई वडिलांनी पण आपल्या सवयींवर नियंत्रण ठेवले पाहिजे. कारण मुलं आई बाबांना पाहूनच शिकतात तसेच संत महादेव महाराज यांनी या हिंदू संमेलन साठी आशिर्वचन दिले. कार्यक्रमाचे संचालन संजय पळसकर यांनी अत्यंत प्रभावी व ओघवत्या शैलीत केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन महिला संयोजक सौ.मंजुषा गायधने यांनी केले तर प्रास्तविक महिन सपकाळ यांनी केले. विविध समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रमपूर्वक योगदान देत कार्यक्रमाची शिस्तबद्ध अंमलबजावणी केली. या सम्मेलनाला मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवर, आयोजक, स्वयंसेवक आणि सर्व सहकारी कार्यकर्त्यांचे आभार संमेलनाचे संयोजक हेमंत वाघाडे यांनी मानले. या हिंदू सम्मेलनाच्या माध्यमातून समाजात एकता, संस्कार, राष्ट्रीय भावना व सामाजिक बांधिलकी दृढ करण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला. नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला असून, भविष्यात अशा उपक्रमांद्वारे समाजजागृती अधिक बळकट होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जानकी नगर वस्तीतील प्रदीप गणोरकर, मनोहरराव सपकाळ, अभिलाष लिखणकर, उकंडराव चौधरी, गजानन शेळके, मदन व ऱ्हाडे, राजेश वाघाडे, भालचंद्र दाणी, गजानन कोहळे, डॉ.राजेश कुऱ्हाडे, देवराव प्रधान, अथर्व धारूडकर, पराग धर्माधिकारी, नरेंद्र खराबे, विकास हिंगे, किशोर बुराडे, अविनाश गणोरकर, संजय गाडगे, दीपक डुमरे, आकाश वाघाडे, पुष्कर आगाशे, शुभम बुराडे, कार्तिक गणोरकर, बाळू अंभोरे, यश ठाकरे, आयुष ठाकरे, अनिता वाघाडे, पूजा वाघाडे, दिगांबर गेडाम, अबोली घडोले, सुवर्णा नांदुरकर, रंजना चट्टे, सीमा भारद्वाज, तारिका मेश्राम आणि मेघा गणोरकर वस्तीतील सर्व नागरिक बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले.

Popular Articles