कन्हान :- सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ मंदीर पिपरी व्दारे भोसले कालीन प्राचीन दुर्गा मंदीरात चैत्र नवरात्र उत्सव उत्साहाने संपन्न करण्यात आला.
गुरूवार (दि.१९) मार्च ला भोसले कालीन प्राचीन दुर्गा मंदीरात दरवर्षी प्रमाणे चैत्र नवरात्र निमित्य विधीवत पुजा, अर्चना आणि घटस्थापन करून दररोज सकाळ, संध्याकाळ पुजन, आरती, भजन करू न गुरूवार (दि.२६) मार्च ला अष्टमी हवन करून महाप्रसाद वितरण करण्यात आला तथा समारोप प्रसंगी पारंपरिक पद्धतीने कन्हान-पिपरी नदीच्या पावन पात्रात घट विसर्जन करून चैत्र नवरात्र उत्सव मोठया उत्साहात संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष देवा चतुर, नगरपरिषद सत्तापक्ष नेते तथा नगर सेवक मनोज कुरडकर, समाजसेवक प्रशांत बाजीराव मसार, सदस्य फजित खांगरे, दिलीप येलमुले, सुनील चाफले, सचिन खांगारे, पिंपरी दुर्गा मंदीर भंजन मंडळ अध्यक्ष राधेश्याम भोयर, पुरुषोत्तम येलेकर, कंठीराम मेश्राम, मनेहर कुवामनोरे, रवी अजबले, राधा भोयर, लक्ष्मी कुळे, इंदु गेडेकार, सुनीता फुलझले, पुष्पा खंगारे आदी सह नागरिकांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.








