Monday, April 27, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आसमान फाउंडेशन तर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय मार्गदर्शक शिबिराचे आयोजन सेवाग्राम येथे संपन्न

– आसमान फाउंडेशन वर्धा शाखा व आशा लर्निग सेंटरच्या तर्फे सेवाग्राम येथे संपन्न

वर्धा :- सामाजिक कार्यात अग्रेसर सामाजिक संस्था आसमान फाउंडेशनच्या वतीने वर्धा येथे गरजू निराधार, गरीब, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक मार्गदर्शनासाठी तीन दिवसीय शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरांचे आयोजन आसमान फाउंडेशन वर्धा शाखा व आशा लर्निग सेंटरच्या वतीने सेवाग्राम येथे केले गेले. शिबिरातील मुलांसाठी अनेक शैक्षणिक व मार्गदर्शनपर उपक्रम घेण्यात आले. फाउंडेशन तर्फे शिबिरातील विद्यार्थ्यांसाठी तीन ही दिवसांची नाश्ता व्यवस्था केली गेली. शिबिरांच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे वर्धा शाखा प्रमुख श्याम चंद्रा, रामकृष्ण धकाते, दिलीप मसने, सचिन, अमर व आशा लर्निग सेंटरच्या प्रमुख नूतन माळवी यांनी अथक परिश्रम घेतले. आसमान फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. रवि गिऱ्हे, सचिव नरेश शेंडे, सहसचिव विभा विंचुरकर, दिनेश टेकाडे, मेघा गिऱ्हे, डॉ. साधना थोते, प्रमोद हेडाऊ, भास्कर मुलताईकर यांनी परिक्षम घेतले व यशस्वीरित्या पार पडले. असे डॉ. रवि गि-हे यांनी कळविले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.