Monday, April 27, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रनेरा येथे दोन लाखाची चोरी ; सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल

हंसराज,भंडारा सिहोरा :- पोलीस स्टेशन सिहोरा अंतर्गत असलेल्या रनेरा (डाग बंगला) येथील शरद श्रावण पटले वय 51 वर्ष यांचे राहाते घरी चोरट्यांनी 2 लाख 20 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याचे पोलिसी वृत्त पुढे आले आहे.सिहोरा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अ.क्र. 172/2026 कलम 331(4), 305 (अ) भा.न्या.स. अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

फिर्यादी शरद पटले व त्याची पत्नी हे काल 25 एप्रिल रोजी आपल्या घराचे समोरील दाराला कुलूप लावून तुमसर येथे आपल्या नातेवाईकाकडे सायंकाळी अंदाजे 7 ते 7.30 दरम्यान गेले होते. कार्यक्रम आटोपून 10 ते 10.30 पर्यंत घरी परत आले असता त्यांना घराचे समोरील दार उघडे दिसले.

घराचे आत जावुन पाहणी केली असता हॉलमध्ये ठेवलेली लोखंडी आलमारी उघडी दिसली व आलमारीतील लॉकर तुटलेले दिसुन आले. वस्तु अस्तव्यस्त दिसुन आल्याने लॉकरच्या आत पाहीले असता लॉकरमध्ये ठेवलेले 30 वर्षापुर्वी खरेदी केलेले जुन्या सोन्याच्या 2 पाटल्या किंमत अंदाजे 1 लाख 60 हजार रुपये, सोन्याचे दोन लॉकेट 20 हजार रुपये, आलमारीत सुटकेसच्या बाजुला ठेवलेले 20 हजार रुपये तसेच बेडरूम मधील अलमारीचा लॉकर तोडून 1 जोड चांदीची पायपट्टी किंमत 10 हजार रुपये, सोन्याचे 20 मनी किंमत 10 हजार रुपये रु असा एकुण 2 लाख 20 हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोराने सुना मौका पाहुण फिर्यादीचे घरात प्रवेश करुन हॉल व बेडरुम मधील लोखंडी आलमारीचे लॉकर तोडुन सोन्या-चांदीचे दागीने व नगदी रक्कम चोरुन नेले आहे. सदरचा गुन्हा तपासात घेतला असून अज्ञात आरोपी विरुद्ध तपास सुरू आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.