Tuesday, April 28, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अनधिकृत एच टी बी टी बियाणे, अवैध कीटकनाशके व खत, लिंकिंग निषेधार्थ अधिकृत विक्रेत्यांची आस्थापने बेमुदत बंद

– खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांची कोंडी, अडचणी वाढल्या

खापा, वार्ताहर :- राज्यातील शेतकरी रासायनिक खतांच्या तुटवड्यामुळे आधीच चिंतेत असताना, आता स्थानिक अधिकृत खत, बी-बियाणे विक्रेत्यांनी महाराष्ट्र खते, कीटकनाशके आणि बियाणे विक्रेता संघटनेने (MAFDA माफदा) पुकारलेल्या संपाला पाठिंबा देत सोमवारपासून (२७ एप्रिल) अनिश्चित काळासाठी संपाची घोषणा केल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

रासायनिक खत, बी-बियाणे विक्रेते म्हणाले की, परिसरात एच टी बी टी कंपनीचे अनधिकृत बियाणे विकले जात आहे. ज्याची गुणवत्ता कमी आहे. अवैध कीटकनाशके व बी-बियाणे थेट शेतकऱ्याला अनधिकृत एजंट द्वारे विक्री करून कंपनी शेतकऱ्यांना घरपोच सेवा देत आहे. ज्याचा परिणाम अधिकृत दुकानदारांवर होत आहे. त्याचप्रमाणे रासायनिक खत कंपन्याकडून केल्या जाणाऱ्या खतांच्या जोडणीलाही विरोध करण्यात आला. जाचक साथी ऍपच्या माध्यमातून बियाणे विक्री अनिवार्य, किरकोळ खत विक्रेत्यावर लावलेल्या जाचक नियम, कीटकनाशक कंपनीकडून एक्सपायरी मटेरिअल वापस न घेणे, इन्सपेक्टर राज मध्ये पून्हा वाढ, नवीन लागू होणारे जाचक बी बियाणे व कीटकनाशक कायदे, दुकानदाराला सील बंद कृषी निविष्ठा केल्यावर ही शिक्षा होते, या अन्यया विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे, अशी माहिती दिली.

अनेक शेतकरी या बोगस बियाण्यांचा शिकार झाले आहेत. सरकार लहान दुकानदारांवर कारवाई करते, तर बोगस बियाणे उत्पादक कंपन्यांवर कोणतीही कारवाई करत नाही. अधिकृत विक्रेत्यांच्या दुकानांवर ग्राहक हे नदारत झाले आहे. कृषी केंद्र संचालकांनी उपस्थित केलेल्या मागणीवर शासनाने लवकरात लवकर तोडगा काढावा. अशी अपेक्षा कृषी केंद्र संचालकांनी केली आहे.

खापा शहरातील खत बियाणे विक्रेत्यांनी निषेधार्थ त्यांचे आस्थापने बेमुदत बंद ठेवले. यावेळी नरेंद्र देशपांडे, सादिक वाघाडे, अनुराग देशपांडे, ताराचंद बोकडे, राजू आष्टनकर, तुषार जानुस्कर, मोहित ढोंगे आदी विक्रेते उपस्थित होते.

“विक्रेत्यांच्या प्रमुख मागण्या”

खतांवरील टॅगिंग बंद झाले पाहिजे.

विक्रेत्यांच्या गोदामांपर्यंत माल पोहचविण्यात आला पाहिजे.

डीलर्सचा नफा ८% असावा.

ज्या कंपन्यांचे नमुने सदोष आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.

डीलर्स साक्षीदार असावेत.

सीड पार्टनर पोर्टल केवळ कंपन्यांपुरते मर्यादित असावे.

परवाना निलंबित झाल्यास, तो २१ दिवसांच्या आत स्वतः पुनर्स्थापित झाला पाहिजे.

शेतकऱ्यांच्या खोट्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन करावी.

“खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता “

खत कंपन्यांच्या सक्तीच्या खरेदी-विक्री संबंधांचा आणि गुंतागुंतीच्या प्रशासकीय अटींचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र खते, कीटकनाशके आणि बियाणे विक्रेता संघटनेने (MAFDA माफदा) हे आंदोलन सुरू केले आहे. खतांचा तुटवडा आणि संपामुळे विक्री केंद्रे बंद झाल्याने शेतकरी बिकट परिस्थितीत सापडले आहेत, ज्यामुळे आगामी खरीप हंगामाच्या तयारीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

“खतांसोबत इतर उत्पादने खरेदी करण्यासाठी सक्ती”

बाजारात युरिया आणि डीएपी (DAP) सारख्या अत्यावश्यक खतांचा तुटवडा आधीच जाणवत आहे. कंपन्यांना खतांसोबत इतर अनावश्यक उत्पादने खरेदी करण्यास भाग पाडल्यामुळे विक्रेते आणि शेतकरी दोघेही त्रस्त झाले आहेत. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या खर्चावर होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.