spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुख्य सूत्रधार प्रवीण माहिरे यांच्या मोबाईलची सीडीआर तपासणी तातडीने करण्याची मागणी – प्रा.सचिन काळबांडे

– महसूल सहाय्यक नरेश बर्वे लाच प्रकरणात बर्वेंच्या मोबाईलची सीडीआर व मुख्य सूत्रधार प्रवीण माहिरे यांच्या मोबाईलची सीडीआर तपासणी तातडीने करण्याची मागणी: प्रा.सचिन काळबांडे

नागपूर :- महसूल सहाय्यक नरेश साधुराम बर्वे लाच प्रकरण संदर्भात पत्रपरिषदेत तक्रारदार प्रा. सचिन काळबांडे यांनी पत्रकारांना या लाच प्रकरणा संदर्भात माहिती दिली. या प्रकरणात मुख्य सूत्रधार अति. जिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांच्यावर लाच प्रकरण संदर्भात कडक कारवाई करण्याची मागणी पत्रपरिषदेत केली आहे. मागील दीड ते दोन वर्षापासून तक्रारदार प्रा. सचिन काळबांडे हे या प्रकरणापासून मानसिकरित्या, शारीरिकरित्या व खूप त्रासलेले आहे. त्यांना चुकीने गांधीबाग झोन मधून नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी परिषदेत केली आहे आणि या प्रकरणात राजकीय लोक सहभागी आहे. असा संशय व्यक्त करून याची सकोल चौकशी करावी. अशी मागणी व आरोप केला आहे. बांधकामाची अपील निकाली काढण्यासाठी पाच लाखाची लाच स्वीकारताना प्रतिबंधक विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक नरेश बर्वे यांना नंदनवन परिसरातून दि. 24 एप्रिल (शुक्रवारी) रात्री ११:३० वाजता एसीबीच्या पथकाने अटक केली. त्या संदर्भात प्रा.सचिन काळबांडे यांनी पत्रकारांना माहिती दिली. याप्रसंगी सोबत अँड ईश्वर दाऊदसरे यांची उपस्थिती होती.

Popular Articles